कोलंबो: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs SL 2nd ODI) 4 ऑगस्ट रोजी कोलंबो येथील प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Premadasa International Cricket Stadium, Colombo) खेळवला जाणार आहे. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर आता दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतील आणि त्यांना पहिला विजय नोंदवायचा आहे. पण, दुसरा सामना सुरू होण्याआधी, कोलंबोच्या हवामानाशी संबंधित ताजे अपडेट समोर आले आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण, रविवारी दुसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. (हे देखील वाचा: IND vs SL 2nd ODI Playing 11: दुसऱ्या वनडेत भारताच्या प्लेइंग-11 मध्ये होऊ शकतात हे 3 मोठे बदल, खराब कामगिरी करणाऱ्यांना टाटा, बाय-बाय)
रविवारी कसे असेल हवामान?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कोलंबोमध्ये खेळवला जात आहे, ज्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी कोलंबोतील हवामान क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवत आहे. वास्तविक, 4 ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, रविवारी पाऊस पडण्याची शक्यता 50 ते 82 टक्के आहे. त्याच वेळी, तापमान 30 अंश ते 26 अंशांच्या दरम्यान राहू शकते. ताशी 10 ते 15 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. आर्द्रता 80 ते 88 टक्के राहण्याची शक्यता आहे.
आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 169 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 99 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामने टाय झाले असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. पाहिले तर टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. मागील 6 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने सर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले आहे. श्रीलंकेने शेवटची वेळ २०२१ मध्ये टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला होता.
दोन्ही संघांची अशी असू शकते प्लेईंग-11
भारतीय क्रिकेट संघातील संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रियान पराग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
श्रीलंका क्रिकेट संघातील संभाव्य प्लेइंग 11: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समाराविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियांगे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेझ, अकिला धनंजय, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.