पुणे कसोटीचा दुसरा दिवस संपला आहे. दुसर्या दिवशी दक्षिण आफ्रिका 565 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने पहिला डाव 601 धावांवर घोषित केला होता, त्या प्रतिक्रिया म्हणून दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट गमावल्यानंतर 36 धावा केल्या आहेत. भारताकडून उमेश यादव याने दोन गडी बाद केले तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली. शमीने टेंबा बावुमा याला ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 8 धावांवर बाद केले.
SA 36/2 in 15 Overs | India vs South Africa 2nd Test Day 2 Updates: दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात, 36 धावांवर गमावले 3 विकेट्स
भारतीय संघ (Indian Team) आज दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध मोठा स्कोर करण्याच्या वाटेवर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 3 बाद 273 धावा होत्या. सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आणि पहिल्याच दिवशी शतकी खेळी करत संघाला मोठा स्कोर करण्यास सहाय्य केले. अग्रवालने 195 चेंडूत 108 धावा केल्या आणि कगिसो रबाडाच्या चेंडूवर माघारी परतला. यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 215 धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताना कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताच्या डावाची सुरुवात करतील. विराट त्याच्या 26 व्या टेस्ट शतकाच्या जवळ आहे राहणे त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकतो. विराटने रहाणेबरोबर चौथ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली आहे.
पहिल्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. रोहित शर्मा 14 धावा करून लवकर बाद झाला. त्यानंतर, अग्रवालने दुसर्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारा सह 138 धावांची भागीदारी केली. पुजारा 58 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवशी भारताचे तीन गडी बाद केले. विशेष म्हणजे तेंही विकेट रबाडाने घेतल्या. सुरुवातीच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अधिक चांगला लय दाखवत गोलंदाजी केली आणि भारतीय फलंदाजांना मुक्तपणे खेळू दिले नाही. विशेषत: रबाडाने त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केले.