महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni), टीम इंडिया (Indian Team) चा स्टार विकेटकीपर-फलंदाजने आज आयसीसी (ICC) विश्वचषक सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय. भारत-न्यूझीलंडमधील विश्वचषक सेमीफायनल सामना मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळाला जाईल. आजच्या या महत्वाच्या सामन्यात एकीकडे चाहत्यांचे लक्ष सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) वर असणार आहे. दुसरीकडे, आजचा सामना भारताचा माजी कर्णधार धोनीसाठी देखील महत्वाचा असणार आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये धोनी साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर सर्व बाजूने टीका होत आहे. (IND vs NZ, ICC World Cup 2019 Semi-Final: टॉस जिंकून न्यूझीलंडची फलंदाजी, कुलदीप यादवच्या जागी युझवेन्द्र चहल संघात)
न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल मॅच ही धोनीच्या वनडे करिअरमधील 350 वा सामना आहे. याच बरोबर धोनी, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नंतर 350 वनडे सामना खेळणारा भारत दुसरा झाला. शिवाय त्याने श्रीलंकेच्या माजी स्पिनर मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरनने देखील 350 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत.
सर्वाधिक वनडे खेळलेला क्रिकेटपटू
सचिन तेंडुलकर-463
महेला जयवर्धने-448
सनथ जयसूर्या-445
कुमार संगकारा-404
शाहिद आफ्रिदी -398
इंजमाम उल हक-378
रिकी पॉन्टिंग-375
वसीम अक्रम -356
मुथय्या मुरलीधरन-350
एमएस धोनी- 350*
आतापर्यंत धोनीने टीम इंडियासाठी 349 वनडे आणि आशिया इलेव्हनसाठी 3 सामने खेळले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी भारताने 11 जणांच्या संघात एक बदल केला आहे. भारताने या सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ऐवजी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ला आज संधी दिली आहे. तसेच न्यूझीलंडने टीम साऊथी ऐवजी लॉकी फर्ग्यूसन (Lockie Ferguson) ला संधी दिली आहे.