IND vs NZ, ICC World Cup 2019 Semi-Final: टॉस जिंकून न्यूझीलंडची फलंदाजी, कुलदीप यादवच्या जागी युझवेन्द्र चहल संघात

ओल्ड ट्रॅफर्ड, मॅन्चेस्टर येथे खेळण्यात येणाऱ्या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंड ने पहिले फलंदाजी चा निर्णय घेतला आहे. भारतासाठी आजच्या सामन्यात युझवेन्द्र चहल संघात परतला आहे.

IND vs NZ, ICC World Cup 2019 Semi-Final: टॉस जिंकून न्यूझीलंडची फलंदाजी, कुलदीप यादवच्या जागी युझवेन्द्र चहल संघात

आयसीसी (ICC) विश्वचषकमध्ये आज भारतीय संघ न्यूझीलंडशी सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड, मॅन्चेस्टर येथे खेळण्यात येणाऱ्या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंड (New Zealand) ने पहिले फलंदाजी चा निर्णय घेतला आहे. भारतासाठी आजच्या सामन्यात युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) संघात परतला आहे. तर कुलदीप यादव याला बाहेर करण्यात आले आहेत. दरम्यान, यंदाच्या विश्वचषकमध्ये भारत-न्यूझीलंड यांचा हा पहिला सामना आहे. साखळी फेरीतील सामना पावासामुळे रद्द झाला होता. आजच्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. याचाच अर्थ नाणेफेक होण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. (India vs New Zealand World Cup 2019 Semi-Final भारत विरुद्ध न्यूझीलंड World Cup 2019 Semi-Final Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs NZ मॅच चा LIVE आनंद)

दरम्यान, ब्रिटिश हवामान विभागानुसार आज मॅन्चेस्टरमध्ये पावसाची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असेल आणि अधून मधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजल्यापासून 50 टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध आजच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपला 350वा वनडे सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा धोनी 10वा खेळाडू आहे. भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 463 वनडे सामना खेळण्याचा विक्रम केला आहे.

टीम इंडिया: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा

टीम न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोलस, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, जेम्स निशम, कॉलिन डी ग्रँडहोमे, मिशेल सेंटनर, मॅट हेन्री, लोकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2019 02:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).