आयसीसी (ICC) विश्वचषकमधील सेमीफायनलच्या सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत (India) आणि न्यूजीलंड (New Zealand) यांच्यात लढत होणार आहे. भारत-न्यूझीलंड मधील सामना मॅन्चेस्टर (Manchester) येथे खेळेल जाईल. भारत-न्यूझीलंडमधील सामना बघण्यासाठी हजारो प्रेक्षक मॅन्चेस्टरला पोहचले आहे. जे चाहते इंग्लंड ला जाऊन हा सामना बघण्यात असमर्थ आहे ते टीव्ही वर DD Sports वर या सामन्याचा आनंद लुटू शकतात. दरम्यान, देशाचा बहुचर्चित रेडिओ चॅनेल प्रसार भरती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) भारत-न्यूझीलंड सामन्याची लाइव कमेंट्री करणार आहे. आपण प्रसार भारती च्या FM 106.40 मेगाहर्ट्ज वर जाऊन या सामन्याची कॉमेंटरी ऐकू शकतात. (India vs New Zealand Weather Report: भारत वि. न्यूझीलंड सेमीफायनल सामन्यावर पावसाचे सावट; जाणून घ्या काय होईल जर ही मॅच रद्द झाली तर?)

साखळी फेरीतील अटीतटीच्या लढतीनंतर हे 4 संघ बाद फेरीत दाखल झाले. टीम इंडिया अव्वल स्थानी असून त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया (Australia), इंग्लंड (England)आणि न्यूझीलंड यांनी बाजी मारली. आजच्या भारत-न्यूझीलंड मॅचमध्ये सर्वांच्या नजरा असतील त्या 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर. यंदाच्या विश्वचषकमध्ये रोहितने धावांचा पाऊस पाडला आहे. आतापर्यंत 8 सामन्यात रोहितने 5 शतकांसह 647 धावा केल्या आहेत. आपल्या तुफानी खेळीच्या जोरावर रोहितने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत.

यंदाच्या विश्वचषतमधील भारताचा न्यूझीलंडविरुद्ध हा पहिला सामना असणार आहे. याआधी भारत-न्यूझीलंड यांच्यातील झालेला सामना पावसामुळं रद्द झाला होता. त्यामुळे या साम्यावर जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.