India vs Bangladesh T20I: राजकोट मॅचमध्ये रोहित शर्मा याने मोडला एमएस धोनी चा रेकॉर्ड, जाणून घ्या
रोहित शर्मा आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

गुरुवारी बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 8 विकेट्सने संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. या विजयासह भारताने (India) बांग्लादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात रोहितने 43 चेंडूत 6 षटकार आणि त्याच चौकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. यासह रोहितने एका कॅलेंडर वर्षातील तिसरा सर्वाधिक षटकार मारला खेळाडू ठरला, जो की एक विश्वविक्रम आहे. या सामन्यात रोहितने ऑफस्पिनर मोसादड हुसेन याच्या ओव्हरमध्ये सलग तीन चेंडूत तीन षटकार ठोकले आणि एका कॅलेंडर वर्षात सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला. (IND vs BAN 2nd T20I: मॅचदरम्यान थर्ड अंपायरच्या चुकीवर भडकला रोहित शर्मा, मैदानावर 'या' अंदाजात केला राग व्यक्त, पाहा Video)

बांग्लादेशने दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताची सलामी जोडी रोहित आणि शिखर धवन यांनी जोरदार बॅटिंग करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. राजकोटमधील सहा षटकार मारत रोहितने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला पिछाडीवर टाकत एका केली. दुसर्‍या टी-20 मध्ये सहा षटकार ठोकत रोहित आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराने मारलेल्या सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड मोडला. केवळ 17 डावांमध्ये 37 षटकारांसह रोहितने धोनीला मागे टाकले. या यादीत नियमित कर्णधार विराट कोहली 62 डावांमध्ये 34 षटकार मारत तिसऱ्या स्थानावर आहे. इतकेच नव्हे तर, 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. रोहितने यंदा 66 आंतरराष्ट्रीय षटकार मारले आहेत.

रोहित सध्या बांग्लादेशविरुद्ध टी-20 खेळत आहेत. शिवाय, डिसेंबरमध्ये टीम इंडिया वेस्ट इंडीजसमवेत तीन टी-20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकादेखील खेळणार आहे. अशा परिस्थितीत रोहितकडे स्वतःचे दुसरे विक्रम मोडण्याची उत्तम संधी आहे.