चेन्नई: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नई (Chennai) येथे खेळवला जाणार आहे. गेल्या आठवडाभरापासून दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये एकूण 9 खेळपट्ट्या आहेत. यातील तीन खेळपट्ट्या मुंबईहून आणलेल्या लाल मातीच्या आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना फक्त लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाईल.
चेन्नईत फिरकीपटूंचे वर्चस्व
वास्तविक, चेन्नईत फिरकीपटूंचे वर्चस्व आहे. फिरकीपटूंना येथे खूप वळण मिळते. तथापि, लाल मातीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी देखील उपयुक्त आहे, कारण नवीन चेंडू येथे खूप स्विंग देतो आणि बाउंस देखील उत्कृष्ट आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series 2024: भारत - बांगलादेश कसोटी मालिकेतील 'हे' पाच खेळाडू करु शकतात कहर, आपल्या घातक कामगिरीने करणार मोठे 'विक्रम')
Sound 🔛
We bring you raw sounds 🔊 from #TeamIndia nets as they gear up for Test Cricket action 😎#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8SvdTg29J7
— BCCI (@BCCI) September 17, 2024
आकडेवारीत कोण आहे वरचढ?
बांगलादेशला कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवण्याची संधी भारताने अद्याप दिलेली नाही. बांगलादेश संघाला आतापर्यंत भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 13 पैकी 11 सामने जिंकले असून दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. 2001-01 मध्ये जेव्हा दोन्ही देशांदरम्यान पहिला कसोटी सामना खेळला गेला तेव्हा बांगलादेश हा क्रिकेटचा पोर होता आणि आज तो प्रतिस्पर्धी संघ बनला आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने बाजी मारली होती. चार वर्षांनंतर 2004-05 मध्ये भारताने पुन्हा बांगलादेशी भूमीवर सामना खेळला. यावेळी दोन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाचा सफाया झाला.
पावसामुळे पहिल्या दिवशी सामन्यात येऊ शकतो व्यत्यय
चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवसही पावसामुळे वाहून जाऊ शकतो. वास्तविक, Accuweather नुसार, चेन्नईमध्ये पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पावसाची 40 टक्के शक्यता आहे. तिसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचे तिकीट तुम्हाला मिळाले नसेल, तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर मॅचचा सहज आनंद घेऊ शकता. हा कसोटी सामना वायाकॉम 18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना स्पोर्ट्स 18 चॅनल 1 आणि चॅनल 2 वर पाहू शकता. तसेच हा सामना जिओ सिनेमावर मोबाईलवर पाहता येईल.
पहिल्या कसोटीत बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसैन शांतो, मोमिनुल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, लिटन दास, मेहंदी हसन मेराज, तैजुल इस्लाम, नाहिद राणा आणि हसन महमूद/तस्कीन अहमद.
पहिल्या कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.