चेन्नई: भारत विरुद्ध बांलादेश कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs BAN Test Series 2) 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये तर दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघात अनेक स्टार खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत या मालिकेदरम्यान कोणत्या पाच खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करता येईल, हे जाणून घेऊया.
विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली कसोटी क्रिकेटपासून खुप दिवस दूर आहे. पण आता त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत पुनरागमन केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आता तो खेळताना दिसणार आहे. त्याचा असणार फार्म आणि त्याचा अनुभव हा संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना विराट कोहलीकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. अशा स्थितीत बांगलादेशविरुद्ध विराट कशा प्रकारची फलंदाजी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विराट कोहली त्याच्या 27000 आंतरराष्ट्रीय धावांपासून फक्त 58 धावा दूर आहे. जो तो या मालिकेदरम्यान साध्य करण्याचा प्रयत्न करेल.
यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal)
या मालिकेत भारतीय युवा खेळाडू यशस्वी जैस्वालही टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असेल. गेल्या काही काळापासून जयस्वाल या फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केल्यापासून जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये तापला आहे. त्याने 9 सामन्यात 68.53 च्या सरासरीने 1028 धावा केल्या आहेत. जैस्वाल बांगलादेशविरुद्धही अनेक विक्रम करू शकतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या चक्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याच्याकडे अव्वल स्थानावर पोहोचण्याची मोठी संधी आहे.
मेहदी हसन मिराज (Mehdi Hassan Miraz)
बांगलादेशचा मेहदी हसन मिराज. भारतीय चाहत्यांना या खेळाडूची चांगलीच ओळख असेल. मेहदी हसन मिराझचा भारताविरुद्धचा विक्रम चांगलाच राहिला आहे. गेल्या वेळी भारताने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळली तेव्हा मेहदी हसन मिराझने शानदार गोलंदाजी केली. 2022 मध्ये बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतही त्याने टीम इंडियाला खूप त्रास दिला होता. त्यामुळे टीम इंडियाने ती मालिका गमावली. अलीकडेच, तो पाकिस्तानमधील मालिका सर्वोत्कृष्ट होता, जिथे त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचे 6 विकेट्स 26 धावांवर पडल्यानंतर मेहदीने लिटनसह सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. पहिल्या कसोटीत त्याने मुशफिकुरसोबत सातव्या विकेटसाठी 196 धावा जोडून बांगलादेशला 500 च्या पुढे नेले.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)
बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनही या मालिकेत ॲक्शन करताना दिसणार आहे. शाकिब हा क्लच खेळाडू आहे, जो संधी मिळाल्यावर आपल्या संघासाठी बरेच काही करू शकतो. शकीब अल हसनने टीम इंडियाविरुद्ध अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. त्याला संघातील इतर खेळाडूंची फार कमी साथ मिळाली असली तरी यावेळी बांगलादेशचा संघ चांगलाच आहे. अशा परिस्थितीत शाकिबला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे.
नाहिद राणा (Nahid Rana)
नाहिद राणा सध्या बांगलादेशमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंतच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये सुमारे 145 किमी प्रतितास सरासरी वेग राखला आहे आणि लयीत असताना, तो 150 किमी प्रतितास इतका वेग देखील गाठू शकतो. राणाने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्या, त्यात त्याच्या पहिल्या तीन षटकांत तीन विकेट्स, ज्यात बाबर आझम आणि फॉर्मात असलेल्या सौद शकीलच्या विकेट्सचा समावेश होता. चेन्नईच्या खेळपट्टीवर नाहिद राणा चांगली गोलंदाजी करू शकतो. चेन्नईतील पहिला कसोटी सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाईल. जे वेगवान गोलंदाजांसाठी खूप चांगले आहे