Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका (IND vs BAN Test Series 2024) खेळवली जात आहे. यांच्यातील पहिला सामना चेन्नई (Chennai) येथे खेळवला गेला. जिथे भारतीय संघाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी, मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur Greean Park Stadium) खेळवला जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टिकोनातूनही हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.
All to play for in the final Test of the #IDFCFirstBankTestSeries! 🏏
Catch the 2nd #INDvBAN clash LIVE from 27th September,only on #JioCinema & #Sports18 👈#JioCinemaSports pic.twitter.com/Xowl4Ex3u2
— JioCinema (@JioCinema) September 25, 2024
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर येथे सकाळी 09:30 वाजता खेळवला जाईल. तसेच चाहत्यानां या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. त्याचवेळी चाहत्यांना जिओ सिनेमा ॲप, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर या मालिकेचा आनंद घेता येईल. याशिवाय आगामी मालिकेची प्रत्येक क्षणाची माहिती तुम्ही Latestly Marathi च्या वेबसाइटवर पाहू शकता.
हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test 2024: रोहित शर्मा मोडणार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा विक्रम! फक्त 'इतक्या' धावांची गरज
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
बांगलादेश
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.