भारत (India) अंडर-19 आशिया कप (U19 Asia Cup) 2021 मोहिमेची सुरुवात यजमान संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध (United Arab Emirates) 23 डिसेंबर रोजी अ गटातील पहिल्या लढतीने करेल. भारतीय संघाची (Indian Team) नजर स्पर्धेत विजयी सुरुवातीवर असेल. हा सामना दुबई, UAE मधील ICC अकादमी ग्राउंडवर खेळला जाईल आणि IST सकाळी 11:00 वाजता सुरू होणार आहे. कमी-अनुभवी युएई संघाविरुद्ध टीम इंडिया (Team India) विजयाचा प्रबळ दावेदार मानली जात आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा यश धुलच्या हाती असणार आहे. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकपूर्वी संघासाठी ही स्पर्धा तयारी म्हणून उपयुक्त ठरू शकते. दरम्यान, भारत विरुद्ध युएई अंडर-19 आशिया चषक सामन्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. (U-19 Asia Cup 2021: उद्या अंडर-19 आशिया चषकाचा भारत विरुद्ध UAE सामना रंगणार, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक)
भारत विरुद्ध UAE U19 आशिया कप 2021 सामना 23 डिसेंबर 2021 (गुरुवार) रोजी दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानावर खेळला जाईल. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार सकाळी 11.00 वाजता होईल. तथापि भारतात अंडर-19 आशिया चषक 2021 चे कोणतेही अधिकृत प्रसारक नसल्यामुळे चाहते टीव्हीवर भारत विरुद्ध UAE सामना लाइव्ह पाहू शकणार नाहीत. मात्र स्टार स्पोर्ट्स फक्त अंतिम सामना प्रसारित करेल. याशिवाय चाहते भारत अंडर-19 विरुद्ध UAE अंडर-19 आशिया कप 2021 सामना लाइव्ह स्ट्रीम करू शकणार नाहीत. Disney+Hotstar वर केवळ स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम उपलब्ध असेल.
भारत अंडर 19 आशिया चषक संघ: हरनूर सिंग पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुल (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्या यादव (कर्णधार), आराध्या यादव (कर्णधार). बावा, राजवर्धन हंगरगेकर, गरव सांगवान, रवी कुमार, ऋषित रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स.