दक्षिण आफ्रिकेत (South Africa) 1992 नंतर प्रथमच कसोटी मालिका विजयाच्या उद्देशाने टीम इंडिया (Team India) काही दिवसांपूर्वी आफ्रिका दौऱ्यावर पोहोचली असून संघाने सरावालाही सुरुवात केली आहे. आणि 2021 मध्ये संस्मरणीय मालिका विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. यंदा केवळ टीम इंडियाने फक्त जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला नाही, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला डाउन अंडर पुन्हा एकदा पराभूत केले आणि नुकतंच मायदेशात न्यूझीलंडवर 1-0 असा विजय मिळवला. तसेच ब्रिटन आणि मायदेशात इंग्लंडवर एकहाती वर्चस्व गाजवले. विराट कोहली (Virat Kohli) तीन कसोटी सामन्यांमध्ये पाहुण्यांचे नेतृत्व करेल. तर डीन एल्गर (Dean Elgar) दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार असेल आणि टेंबा बावुमा उपकर्णधार असेल. (IND vs SA 2021-22: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 'केएल राहुल' कसोटी संघाचा उपकर्णधार, दुखापतीमुळे रोहित शर्माला विश्रांती)
एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) वेळेत बरा झाल्यास टीम इंडियाचे नेतृत्व करेल. जर रोहित अनफिट असेल तर राहुल बहुधा त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कर्णधाराची धुरा हाती घेईल. बावुमा वनडेमध्ये यजमान संघाचे नेतृत्व करेल. लक्षात घ्यायचे की दोन्ही बोर्डांनी अद्याप त्यांच्या वनडे संघांची घोषणा केलेली नाही. कसोटी मालिकेने टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक, भारतीय संघ, टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंगबाबत संपूर्ण माहिती चाहत्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे.
वेळापत्रक
26 डिसेंबर ते 30 डिसेंबर पहिली कसोटी, सेंच्युरियन (दुपारी 1:30 IST)
3 ते 7 जानेवारी दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग (दुपारी 1:30 IST)
11 ते 15 जानेवारी तिसरी कसोटी, केपटाऊन (दुपारी 2:00 IST)
एकदिवसीय मालिका
पहिली वनडे, 19 जानेवारी, पार्ल (दुपारी 2 IST)
दुसरी वनडे, 21 जानेवारी, पार्ल (दुपारी 2 IST)
तिसरी वनडे, 23 जानेवारी, केपटाऊन (दुपारी 2 IST)
पथक (Squad)
भारत: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्करम, विआन मुल्डर, एनरिच नॉर्टजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, काइल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन, डुआन ऑलिव्हियर.
टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
भारत-दक्षिण आफ्रिका मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तर भारतीय चाहते ऑनलाईन डिस्ने + हॉटस्टार अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.