KL Rahul (Photo Credit - Twitter)

दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुलकडे उपकर्णधारपदाची (KL Rahul) जबाबदारी देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) जागी रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी संघाचा नवा उपकर्णधार बनवण्यात आले होते, मात्र तो आपल्या कसोटी सामन्याला सुरुवात करण्यापूर्वीच मुंबईत सराव करताना दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला. एएनआयच्या (ANI) वृत्तानुसार, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार असणार आहे. सोमवारी, बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले की रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी प्रियांक पांचाळचा (Priyanka Panchal) कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांसाठी 16 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत पोहचले असून आता संघाने सरावालाही सुरुवात केली आहे. या दोघांमधील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.

Tweet

केएल राहुल आणि मयंक अग्रवाल करणार ओपनिंग

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे की रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलसोबत मयंक अग्रवाल ओपनिंगची सुरुवात करेल. मयंकने नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (भारत विरुद्ध न्यूझीलंड) शतक झळकावून स्वतःला सिद्ध केले होते. संघाने मालिका 1-0 अशी खिशात घातली होती. ( हे ही वाचा ICC Women Cricket World Cup 2022: महिला एकदिवसीय विश्वचषक 2022ची घोषणा; भारत-पाकिस्तान संघ 'या' दिवशी पुन्हा भिडणार, जाणुन घ्या वेळापत्रक.)

द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, प्रियांक पांचाल, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

कसोटी मालिका

1. पहिली कसोटी 26-31 डिसेंबर, सेंच्युरियन

2. दुसरी कसोटी 03-07 जानेवारी, जोहान्सबर्ग

3. तिसरी कसोटी 11-15 जानेवारी, केप टाऊन

एकदिवसीय मालिका

1. पहिली वनडे 19 जानेवारी, पार्ल बोलंड पार्क

2. दुसरी वनडे 21 जानेवारी, पार्ल बोलंड पार्क

3. तिसरी वनडे 23 जानेवारी, केपटाऊन