भारत महिला टीम (Photo Credit: PTI)

ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022  (ICC Women Cricket World Cup 2022) चा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात पुढील वर्षी 6 मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ (Indian Women Team) आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) करणार आहे. ही स्पर्धा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC मंगळवारी न्यूझीलंडमध्ये 2022 च्या महिला विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 31 सामने खेळवले जाणार आहेत. आयसीसीच्या ICC वेबसाइटच्या वृत्तानुसार, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज (NZ vs WI) यांच्यात 4 मार्च रोजी बे ओव्हलवर सामना होणार आहे.

Tweet

असे असणार भारताचे वेळापत्रक 

ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघाचा सामना यजमान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याशी होणार आहे. भारतीय संघ 10 मार्चला यजमान न्यूझीलंड, 12 मार्चला वेस्ट इंडीज संघ, 16 मार्चला इंग्लंड, 19 मार्चला ऑस्ट्रेलिया, 22 मार्चला बांग्लादेश संघ आणि 27 मार्चला दक्षिण आफ्रिकेशी सामना खेळणार आहे. उपांत्य फेरीचे सामने वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह आणि क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे खेळवले जातील. यानंतर 3 एप्रिल 2022 रोजी क्राइस्टचर्चमध्येच अंतिम सामना खेळवला जाईल.

बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाने कोरोनाव्हायरसमुळे नुकतेच महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरी रद्द केल्यानंतर एकदिवसीय संघाच्या क्रमवारीच्या आधारे विश्वचषकासाठी त्यांची जागा निश्चित केली. यासोबतच महिला क्रिकेटमध्येही जागतिक स्पर्धा पुनरागमन करत आहे. शेवटच्या वेळी महिला विश्वचषक मार्च 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळला गेला होता, जिथे यजमानांनी भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.