IND vs BAN (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारतीय संघ (Team India) 5 जून रोजी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) मोहिमेला सुरुवात करणार आहे, मात्र त्याआधी संघ शनिवारी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मुख्य स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी भारत एकच सराव सामना खेळणार आहे आणि लवकरात लवकर न्यूयॉर्कमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संघ 26 मे रोजी अमेरिकेत पोहोचला आणि बुधवारपासून संघाने सराव सत्राला सुरुवात केली. विराट कोहली वगळता टीमचे सर्व सदस्य न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. कोहलीही गुरुवारी रात्री न्यूयॉर्कला रवाना झाला आणि लवकरच संघात सामील होईल, परंतु सराव सामन्यातील त्याच्या सहभागावर शंका कायम आहे.

दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळणार रोमांचक सामना

सराव सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार असले तरी दोन्ही संघांमधील इतिहास लक्षात घेता चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. भारतीय संघाचा बांगलादेशवर वरचष्मा असून आतापर्यंत दोन्ही संघांमधील 13 पैकी 12 सामने भारताने जिंकले आहेत. टी-20 विश्वचषकाच्या मागील आवृत्त्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीचे सामने झाले आहेत.

टी-20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्याचे प्रसारण आणि ऑनलाइन प्रक्षेपण संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया…

किती वाजता होणार सामना?

भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 विश्वचषक 2024 चा सराव सामना शनिवार, 1 जून रोजी होणार असुन हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तसेच भारतीय वेळेनुसार हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होईल. (हे देखील वाचा: Virat Kohli Record Team India: कोहली टी-20 विश्वचषकात रचू शकतो इतिहास, 267 धावा केल्यानंतर करणार 'हा' पराक्रम)

कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

टी-20 विश्वचषक 2024 च्या विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. इंग्लिशमध्ये लाइव्ह कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स 1 HD/SD वर उपलब्ध असेल आणि हिंदी कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स हिंदी HD/SD वर उपलब्ध असेल. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, स्टार स्पोर्ट्स चॅनल बंगाली, कन्नड, तेलगू आणि तामिळसह इतर भाषांमध्ये थेट समालोचन प्रदान करेल. डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.