
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराषट्रीय स्टेडियममध्ये 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करत असलेल्या टीम इंडियाचा सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने 26 धावा करताच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या खास क्लबमध्ये शामिल झाला आहे. खारी पियरे याच्या चेंडूवर षटकार लगावत राहुलने हजार धावांचा टप्पा गाठला. शुक्रवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्यात राहुलने टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो सातवा भारतीय फलंदाज बनला आहे. आजवर रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, शिखर धवन आणि युवराज सिंह यांनी टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा गाठला आहे. राहुलने 29 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. इतकेच नाही तर कर्णधार विराटनंतर सर्वात जलद एक हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. (IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिज फलंदाजांचे वर्चस्व, टीम इंडियाला विजयासाठी 208 धावांचे आव्हान)
कोहलीने भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद 27 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला होता. दरम्यान, राहुल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याच्यासह संयुक्तपाने तिसरे सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण केल्या. फिंच नेही 29 डावात ही कामगिरी बजावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम याने सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण केल्या आहे. बाबरने केवळ 26 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.
दुसरीकडे, नुकत्याच संपुष्टात आलेल्या विजयने विजय हजारे ट्रॉफीच्या 11 सामन्यात 66.64 च्या सरासरीने राहुलने 598 धावा केल्या होत्या. ही स्पर्धा राहुलसाठी खास राहिली कारण त्याचा संघाने (कर्नाटक) विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राहुलने आपल्या संघाला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.