टीम इंडिया (Photo Credits: IANS)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे, पहिले फलंदाजी करत विंडीज संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 बाद 207 धावा केल्या. या सामन्यात विजय मिळवता दोन्ही संघ मालिकेत आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करतील. वेस्ट इंडिजकडून शिमरोन हेटमेयर (Shimron Hetmyer) याने सर्वाधिक धावा केल्या. हेटमेयरने 2 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावा केल्या. त्यानंतर त्याचा साथ दिला तो कर्णधार कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने. पोलार्डने 1 चौकार आणि 4 शतकारांसह 37 धावा केल्या. भारताविरुद्ध टॉस गमावून पहिले फलंदाजी करत असलेल्या विंडीजव्ही सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये विंडीजने 13 धावा केल्या. मात्र, पुढच्याच षटकातील दुसर्‍या चेंडूवर लेंडल सिमन्स 2 धावांवर रोहित शर्मा याच्या हाती दिपक चाहर (Deepak Chahar) याच्या चेंडूवर झेलबाद झाला. टीम इंडियासाठी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने 2 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (T20 World Cup 2020: टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी विराट कोहली याच्या माहितीने टीम इंडियाच्या गोलंदाजांमध्ये रंगणार चुरशीचा सामना, वाचा सविस्तर)

वेस्ट इंडिज फलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व कायम ठेवले. 10 षटकांत विंडीजने 2 गडी गमावून 101 धावा केल्या होत्या. या सामन्यात अखेरच्या काही ओव्हरदरम्यान भारतीय खेळाडूंकडून चुकीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. वॉशिंग्टन सुंदर याने एक सुकर कॅच सोडला. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कठीण कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. शेवटच्या काही ओव्हरमध्ये माजी विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर (Jason Holder) याने काही धोकादायक शॉट खेळले. होल्डरने 9 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. होल्डर 24 आणि दिनेश (Denesh Ramdin) रामदिन 11 धावांवर नाबाद राहिले. मालिका सुरू होण्यापूर्वी शिखर धवन जखमी झाल्याने त्याच्या जागी संजू सॅमसन याचा संघात समावेश करण्यात आला होता. पण पहिल्या मॅचसाठी त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.

यावर्षी ऑगस्टमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या दौर्‍यावर भारताने 3-0 वनडे, 2-0 ने टी-20 आणि 2-0 कसोटी मालिका जिंकली होती.