T20 World Cup 2020: टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी विराट कोहली याच्या माहितीने टीम इंडियाच्या गोलंदाजांमध्ये रंगणार चुरशीचा सामना, वाचा सविस्तर
India cricket team captain Virat Kohli. (Photo Credits: Getty Images)

वेस्ट इंडिज (West Indies) विरूद्ध टी-20 मालिकेला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने माध्यमांना संबोधित करताना आत्मविश्वास दर्शवला की पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक (World Cup) स्पर्धेची तयारी भारताने सुरू केली आहे. याबद्दल माहिती देताना कोहलीने गुरुवारी सांगितले की, पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या (Team India) वेगवान गोलंदाजीत आता फक्त एकच जागा रिक्त आहे. शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणार्‍या तीन आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या पूर्वसंध्येला विराटने सांगितले की वेगवान गोलंदाजीमध्ये भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष अजूनही सुरू आहे. या स्थानासाठी गोलंदाजांमध्ये निरोगी स्पर्धा होईल आणि कोण जागा बनविण्यात यशस्वी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी स्पर्धेसाठी जवळपास स्थान निश्चित केले आहे त्यामुळे, आता दीपक चाहर, नवदीप सैनी आणि खलील अहमद यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. (IND vs WI 1st T20I: केएल राहुल कडे मोठी कामगिरी करण्याची उत्तम संधी; रोहित शर्मा, विराट कोहली सह या Elite लिस्टमध्ये होणार समावेश)

“हा लढा स्पष्टपणे एका जागेसाठी आहे आणि मला वाटते की कमीत कमी तीन जणांनी स्वत:साठी जागा बनविली आहे. ही एक निरोगी स्पर्धा असणार आहे आणि अखेरच्या गोलंदाजांचा उलगडा असा होतो हे पाहणे मनोरंजक असेल,"कोहली म्हणाला. "भुवनेश्वर (भुवी) आणि जसप्रीत बुमराह हे अनुभवी गोलंदाज आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसले आहे.दीपक चहरने शानदार प्रदर्शन केले आहे. शमीने शानदार गोलंदाजी केली. टी-20 क्रिकेटमध्ये त्यांना हवे असलेली लय आणि गोलंदाजी परत मिळाली तर ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी संघासाठी ते खूप उपयुक्त ठरतील," कोहली ने पुढे म्हटले.

भुवनेश्वर आणि शमीच्या पुनरागमनाने टी-20 मधील भारताची वेगवान गोलंदाजी मजबूत केला आहे. शमीने 2017 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता, तर भुवी स्नायूच्या समस्येपासून इजामुक्तनंतर संघात परतला आहे. भुवीने यावर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. दीपक चहरने बांग्लादेशविरुद्ध मालिकेत कामगिरी करून संघात आपला दावा आणखी मजबूत केला आहे. पण, विराट म्हणाला, दीपकशिवाय अनेक वेगवान गोलंदाजही या एका जागेसाठी तयार आहेत. प्रत्येकजण चांगली गोलंदाजी करीत आहे आणि ही संघासाठी चांगली गोष्ट आहे.