
शुक्रवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा (Indian Team) फलंदाज केएल राहुल (KL Rahul) भारतीय क्रिकेटपटूंच्या एलिट यादीत सामील होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी राहुलला फक्त 26 धावांची गरज आहे. एक हजार धावांच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश करणारा तो भारताचा सातवा फलंदाज होईल. आजवर रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), एमएस धोनी, सुरेश रैना, शिखर धवन आणि युवराज सिंह हे या विशेष क्लबचा भाग बनले आहेत. राहुलने आजवर 31 टी-20 सामन्यांच्या 28 डावात 41.34 च्या प्रभावी सरासरीने 974 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास कर्नाटकच्या या फलंदाजाकडे दुसऱ्या वेगवान 1000 टी-20 धावा करण्याची उत्तम संधी आहे. कर्णधार विराट कोहली याने भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद 27 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला होता. (IND vs WI 2019: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात पुन्हा सुरु होणार रेस, वर्षाखेरीस कोण राहणार No 1 'हिटमॅन' की 'किंग कोहली'?)
हैदराबाद येथे होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात राहुलने हे यश संपादन केले तर वेगवान एक हजार टी-20 सामने बनवण्याच्या दृष्टीने तो संयुक्तपणे तिसर्या स्थानावर पोहचेल. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच यानेही 29 डावात ही कामगिरी बजावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम याने सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण केल्या आहे. बाबरने केवळ 26 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. बांग्लादेशविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेमध्ये राहुलने चांगली कामगिरी केली. त्याने नागपुरात सामना जिंकणारा अर्धशतक झळकावले. शिवाय, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आणि तीन अर्धशतकं झळकावली होती.
दरम्यान, वेस्टाइंडीजचा नवीन कर्णधार कीरोन पोलार्ड याच्याकडेही 1000 टी-20 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. पोलार्ड 65 डावांमध्ये 953 धाव तयार आहेत. आजवर विंडीजच्या फक्त तीन खेळाडूंनी एक हजार टी-20 धावा केल्या आहेत. ख्रिस गेल, मार्लन सॅम्युएल्स आणि ड्वेन ब्राव्हो यांनी एक हजार टी -20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. आणि आता पोलार्डला या विशेष क्लबमध्ये जाण्याची संधी आहे. ‘मेन इन ब्लू’ आणि विंडीज संघात तीन टी-20 आणि नंतर तितकेच वनडे सामने खेळणार आहे.