श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I: धर्मशाला (Dharmsala) येथील HPCA स्टेडियमवर भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 6 विकेट्सने मात करत मालिका क्लीन स्वीप केली. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुन्हा एकदा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सलग टी-20 सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाच्या पदरी ऐतिहासिक विजय पाडला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 146 धावा केल्या. 147 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 16.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य सध्या केले. भारताकडून अय्यरने 45 चेंडूत 73 नाबाद धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने 15 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. या सामन्यात काही महत्वपूर्ण रेकॉर्डही बनले  खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SL 3rd T20I: टी-20 मध्ये टीम इंडियाची बादशाहत, ‘हिटमॅन’आर्मीची विश्वविक्रमाला गवसणी; ‘हे’ 2 संघही आहेत जागतिक विक्रम धारक)

1. धर्मशाला येथे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच सर्व कालीन विक्रम आपल्या नावे केला. केला. रोहित शर्मा पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या प्रकरणात त्याने पाकिस्तानी दिग्गज शोएब मलिकला मागे टाकले आहे. रोहितने 125 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला, तर शोएब मलिकने पाकिस्तानसाठी 124 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

2. टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघाची विजयी मोहीम सुरूच आहे. टीम इंडियाने सलग तिसऱ्या टी-20 मालिकेत विरोधी संघाचा क्लीन स्वीप केला आहे. भारताने यावेळी श्रीलंका संघाचा सफाया केला तर यापूर्वी वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता आणि त्याआधी गेल्या वर्षाअखेरीस 3-0 ने न्यूझीलंडला धूळ चारली होती. त्यामुळे या फॉरमॅटमध्ये भारताची विजयी मालिका सुरूच आहे.

3. श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात जबरदस्त अर्धशतक झळकावले. तिसऱ्या सामन्यात त्याने 29 चेंडूत आपले अर्धशतकी पल्ला गाठला. या सामन्यात 50 धावांसह अय्यर या मालिकेत सलग तीन अर्धशतके करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने मालिकेतील पहिल्या सामन्यात 57 तर दुसऱ्या सामन्यात 74 धावा केल्या.

4. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 9 चेंडूंचा सामना केला व एका चौकारासह 5 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चमीराने रोहित शर्माला आपला बाद करवण्याची ही सहावी वेळ होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वेळा क्रिकेटच्या छोट्या स्वरूपात हिटमॅनला बाद करणारा तो गोलंदाज आहे.

5. श्रीलंकेविरुद्ध तिसर्यास मण्यात विजयासह टीम इंडिया घरच्या मैदानावर सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनला आहे. धर्मशाला येथील तिसरा विजय भारताचा 40 वा टी-20 विजय ठरला आहे. तर 39 विजयांसह न्यूझीलंड संघ दुसऱ्या स्थानावर आहे.