IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यासाठी ‘या’ दोन खेळाडूंकडे निवड समितीने फिरवली पाठ, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल! (See Tweets)
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL Series 2021: जुलै महिन्यात भारत श्रीलंकेचा दौरा (India Tour of Sri Lanka) करणार आहे. या दौर्‍याच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेच्या तारखा उघडकीस आल्या आहेत. प्रथम वनडे आणि त्यानंतर टी-20 मालिका खेळली जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी तसेच शेवटचा टी-20 सामना 25 जुलै रोजी खेळला जाईल. 12 दिवसांच्या कालावधीत भारतीय संघ (Indian Team) श्रीलंका दौरा (Sri Lanka Tour) पूर्ण करेल. श्रीलंका दौर्‍यासाठी 20 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली असून शिखर धवनला (Shikhar Dhawan) संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, नितीश राणा, कृष्णप्पा गौतम, चेतन सकारिया आणि वरुण चक्रवर्ती यांना  पहिल्यांदा संधी मिळाली आहे. तसेच टी नटराजन, आवेश खान (Avesh Khan) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांना जागा मिळाली नाही. (IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर ओपनर शिखर धवनला मिळणार नवीन पार्टनर, हे 3 खेळाडू आहेत दावेदार)

आवेश खान इंग्लंडमध्ये भारताच्या दुसऱ्या संघासह नेट गोलंदाज म्हणून गेला आहे तर आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यातील पर्पल-कॅप हर्षलची निवड न केल्यामुळे चाहते संतापले आहेत आणि निवडकर्त्यांवर पक्षपात केल्याचा आरोप करत खडेबोल सुनावले. आवेश आणि हर्षल यांना वगळता आयपीएल स्टार जयदेव उनाडकट, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, राहुल तेवतिया यांच्याकडेही निवड समितीने पाठ फिरवली. याशिवाय, विकेटकीपर म्हणून ईशान किशन व संजू सॅमसन यांचा समावेश झाला आहे. धवनला वयाच्या 35 व्या वर्षी नेतृत्वाची जाबाबदारी सोपवण्यात अली आहे. विराट कोहली आणि मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर उपलब्ध असल्याने श्रीलंका दौऱ्यावर धवन नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

अवेश खान का नाही?

आयपीएलचा सर्वोत्कृष्ट कर्णधार!

अवेश खान एक चांगला पर्याय!

अवेश खान-हर्षल पटेलला का घेतले नाही?

टी नटराजन कोठे आहे?

हर्षल पटेलसाठी निराश

श्रीलंका दौऱ्यावर दोन्ही संघात 3 सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका रंगणार आहे. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा आणि टी-20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीपूर्वी हा दौरा अनेक खेळाडूंसाठी महत्वाची असणार आहे.