विराट कोहली (Photo Credit: Instagram)

क्रिकेटकच्या मैदानावर उतरताच विराट कोहली (Virat Kohli) फक्त एक क्रिकेटपटू असतो. कोहलीला मैदानात उतरताच स्पर्धात्मक रहायला आवडते. मात्र, रविवारी बंगळुरु येथे दक्षिण आफ्रिकाविरूद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मॅचआधी कोहलीला एका वेगळ्याच रूपात पहिले गेले. भारतीय क्रिकेट टीमच्या इन्स्टाग्राम हँडलने कोहलीला लहान मुलासारखे हातवारे करतानाचे फोटो शेअर केले. बंगळुरुमध्ये, विराट आणखी एक मालिका जिंकत दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिका सकारात्मक मार्गावर संपवण्याच्या निर्धारित होता. पण, टीम इंडियाला आज ते काही जमले नाही आणि अखेरीस मालिका 1-1 ने ड्रॉ झाली. पण, या मॅचआधी विराटला लहान मुलांसारखे हावभाव करताना पाहणे चाहत्यांसाठी एक ट्रीट होती. (IND vs SA 3rd T20I: विराट कोहली पुन्हा एकदा धावांच्या शिखरावर; शिखर धवनचा रोहित शर्मा, विराटच्या 'या' यादीत समावेश)

फोटो शेअर करताना भारतीय संघाच्या इंस्टाग्राम हॅण्डलने कॅप्शन देत लिहिले की, "आजकालची मुले #टीमइंडिया #भारतविरुद्धदक्षिणआफ्रिका". मॅच सुरु होण्याआधी सरावादरम्यान विराटला वेडे-वाकडे चेहरे बनवताना कॅप्टर केले गेले. विराटच्या या फोटोवर चाहतेदेखील पसंत करत आहे. भारतीय कर्णधारांच्या हावभावाबद्दल आश्चर्य वाटल्याने चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रियांनी पूर आणला.

 

View this post on Instagram

 

Kids these days 🐯🐯 #TeamIndia #INDvSA @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

पहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया:

तू बरोबर आहेस तो एक लहान मुलगा आहे.  

मुले

दरम्यान, आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने दिलेल्या १३५ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिका संघाने 9 विकेट्स राखत विजय मिळवला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळलेल्या निर्णायक मॅचमध्ये आफ्रिकी कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने महत्वपूर्ण खेळी केली.  डी कॉक 52 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 79 धावांवर नाबाद राहिला. तर, टेम्बा बावुमा (Timba Bavuma) 23 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आणि अशाप्रकारे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 134 धावा केल्या. तर, आफ्रिकेने 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 16.5 ओव्हरमध्ये 1 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.