IND vs SA 1st Test 2019: मोहम्मद शमी याच्या सर्वोत्तम इनस्विंजरवर फाफ डु प्लेसिस ची उडाली दांडी, फलंदाजीही राहिला स्तब्ध, पहा Video
(Photo Credit: Twitter)

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके (South Africa) चा 203 धावांनी धुव्वा उडवला. विशाखापट्टणम टेस्ट मॅचच्या पाचव्या दिवशी भारतीय (India) गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले आणि आफ्रिकेच्या संघाला संघर्ष करण्याची संधी न देता लंच पर्यंत 8 विकेट्स घेतल्या. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाला विजयासाठी 9 विकेट्सची आवश्यकता होती आणि दक्षिण आफ्रिका लक्ष्यपासून 378 धावा दूर होती. आफ्रिकेचा 431 धावांचा पहिला डाव पाहता टीम इंडियाला विजय मिळवणे सोप्पे जाईल असे दिसत नाही. पण, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात सात गडी बाद केले आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. यात सर्वात उठाव कामगिरी केली ती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने. (IND vs SA 1st Test 2019: भारत-दक्षिण आफ्रिका ने पहिल्या टेस्टमध्ये लगावले इतके षटकार की बनला वर्ल्ड रेकॉर्ड, वाचा सविस्तर)

शमीने पाचव्या दिवशी ज्या प्रकारे शानदार गोलंदाजी केली ती पाहून सर्व चाहते खुश झाले. शमीने त्याच्या सर्वोत्तम इनस्विन्गरवर आफ्रिकी कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याला बाद केले. शमीचा तो चेंडू अगदी पाहण्यासारखा होता. इतकेच नाही तर स्वतःडु प्लेसिस देखील काही क्षण मैदानावर स्तब्ध उभा राहिला. 12 व्या ओव्हरमध्ये पाचव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या ड्यू प्लेसिसने तीन चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या. पहा ड्यू प्लेसिसच्या बाद होणारा 'हा' व्हिडिओ:

शमीची ही घातक गोलंदाजी पाहून सोशल मीडियावर यूजर्सदेखील आश्चर्यचकित राहिले आणि ट्विट करून शमीचे कौतुक केले.

हर्षा भोगले

मुंबई इंडियन्स 

प्रत्येक वेळी शमी स्टम्प करतो तेव्हा मला कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीची आठवण येते.

दरम्यान, आजच्या मॅचमध्ये शमीने सलग तीन फलंदाजांना बोल्ड करत आफ्रिकी संघाला कडवे आव्हान दिले. शमीने टेम्बा बवुमा, डु प्लेसिस, क्विंटन डी कॉक आणि अखेरीस डेन पीट यांना बोल्ड केले. भारताच्या या विजयासह त्यांनी ३ सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसरा कसोटी सामना पुणे 10 ऑक्टोबरपासून खेळला जाईल.