भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा 176 धावांचा शानदार डाव संपुष्टात आला. रोहित केशव महाराज याच्या चेंडूवर क्विंटन डी कॉक याच्याकडे झेलबाद झाला. पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रोहितने पहिल्या सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. रोहितचा डाव इतका शानदार होता की विरोधी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसी (Faf du Plessis) यानेदेखील बाद केल्यावर रोहित मैदानाबाहेर परतत असताना त्याचे अभिनंदन केले. एवढेच नाही तर रोहित बाद होऊन परतत असताना पॅव्हिलिअनकडे जात असताना संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनीही उभे राहून त्यांचे कौतुक केले. कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये दाखल होत असताना रोहितला थाप देऊन कौतुक केले. (IND vs SA 1st Test Day 2: मयंक अग्रवाल सुसाट, ठोकले टेस्ट कारकीर्दीतील पहिले दुहेरी शतक)
कोहलीचे हे जेस्चर सोशल मीडियावर चाहत्यांच्या मनात घर करून गेले. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत टीम इंडियाने कॅप्शन देत लिहिले की, "रोहित शर्माकडून प्रभावी खेळी. ड्रेसिंग रूमने केले कौतुक." भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या या दोन्ही कर्णधारांनी रोहितचे अभिनंदन केलेलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फाफने ज्याप्रकारे रोहितचे अभिनंदन केले ते खरोखर कौतुकास्पद आहे.
View this post on Instagram
🔝knock from @rohitsharma45 👏🏻👏🏻 The dressing room acknowledges #TeamIndia 🇮🇳 #INDvSA
फाफ डु प्लेसिस
#SpiritOfCricket #INDvSA pic.twitter.com/MgaAmyt4bS
— BCCI (@BCCI) October 3, 2019
आदर
Respect🙏 ❤
— Supriya Rajput (@SupriyaRajput20) October 3, 2019
चित्र हे सर्व सांगते'
The Pic says it all - Lovely Gesture by the SA Captain !!
Do you like these Gestures ?
— Anuj Sobti 297 (@297Anuj) October 3, 2019
फाफद्वारा उत्कृष्ट गेस्चर
Superb gesture by @faf1307 👍 South Africans have always shown the respect irrespective of the teams they play against 👏
— Sambit Kumar Panda (@sambit_93) October 3, 2019
पहिल्या आणि दुसर्या दिवशीही रोहितने शानदार फलंदाजी केली. रोहितने 244 चेंडूत 23 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने हा डाव खेळला. टेस्ट क्रिकेटमधील रोहितचे हे चौथे तर सलामीला येत पहिले शतक होते. रोहित शर्मासमवेत पहिल्यांदा डावाची सुरुवात करणाऱ्या मयंक अग्रवाल साठीही हा सामना स्मरणीय होता. दुसऱ्या दिवशी मयंकने टेस्टमधील पहिले शतक पूर्ण केले आणि त्यानंतर दुहेरी शतक करत 215 धावांवर बाद झाला.