IND vs SA 1st Test Day 2: मयंक अग्रवाल सुसाट, ठोकले टेस्ट कारकीर्दीतील पहिले दुहेरी शतक
मयांक अग्रवाल (Photo Credits: Getty Images)

भारताचा युवा टेस्ट सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये करिअरमधील पहिले दुहेरी शतक केले आहे. मयंकने 358 चेंडूत दुहेरी शतक पूर्ण केले. मयंकने केवळ 8 डावात दुहेरी शतकाचा टप्पा गाठला.  मयंक हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने टेस्टमधील आपले पहिले शतकाचे दुहेरी शतकात रूपांतरण केले आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर होता. त्याने उत्कृष्ट शतक ठोकले, तर दुसऱ्या दिवसाच्या पहिले सेशन मयंकच्या नावर राहिले. रोहितने पहिल्या दिवशी शतक केले तर मयंकने त्याच्या पावलावर पाऊल टाकत दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. मयंकने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत आपली शानदार फलंदाजी दाखविली. दुसर्‍या दिवसाचा खेळ चालू असून मयंक क्रीजवर टिकून राहिला आहे. (IND vs SA 1st Test: शोएब अख्तर झाला रोहित शर्मा याचा Fan, 'हिटमॅन' ला दिले 'हे' Nickname Video)

दुसर्‍या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा मयंक अग्रवाल शतकापासून 16 धावा दूर होता, ज्यास गाठण्यास त्याला कोणतीही अडचण आली नव्हती. त्याने 69 व्या ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा गाठला आणि टेस्टमधील पहिले शतक केले. त्याने 204 चेंडूंचा सामना करत 3 आकडी धावसंख्या गाठली. याआधी त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 77 होती. मयंकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे टेस्ट मालिकेत यापूर्वी सर्वाधिक धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी खेळ पावसामुळे लवकर संपल्यावर, दुसऱ्या दिवशी मयंकने अर्धशतक पूर्ण केले आणि रोहित शर्मा याच्या साथीने रेकॉर्ड भागीदारी केली. रोहितच्या साथीने मयंकने अनेक विक्रमांना गवसणी घातली. रोहित आणि मयंकने पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड 317 धावांची भागीदारी केली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेचा पहिला सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी रोहितने टेस्टमध्ये दुसऱ्यांदा दीडशे धावा केल्या. पण, दुहेरी शतक करण्यापूर्वी केशव महाराज याचा गोलंदाजीवर माघारी परतला.