IND vs SA 1st T20I: भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये पावसाची बॅटिंग, सामना रद्द
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात आज धरमशाला इथे होणाऱ्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका नाही तर, पावसानेच बॅटिंग केली. अतिवृष्टीमुळे धर्मशाळाच्या मैदानावर होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. धर्मशाळामध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. शिवाय, आज सकाळी देखील पावसाने विश्रांती घेतली नाही. विश्वचषकमधील निराशाजनक कामगिरीनांतर आफ्रिका संघाचा पहिला दौरा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन्ही मालिका महत्वाची असणार आहे. आजच्या मॅचसाठी रिषभ पंत यांच्याकडे विकेटकिपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. (IND vs SA 1st T20: कॉफी विद शिखर', रवि शास्त्री यांनी धवनला गुरु मंत्र देतानाचा 'हा' Photo केला शेअर, पहा)

वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. टी-20 आणि टेस्ट संघाचे कर्णधार म्हणून विराट कोहली च कायम आहे तर मात्र, दक्षिण आफ्रिकासाठी दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी-20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर टेस्टसाठी फाफ डुप्लेसी यांना कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विश्वचषकमधील निराशाजनक कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा आहे. त्यामुळे, आपली मागील कामगिरी सुधरवण्याचा दोन्ही प्रोतीआसचा निर्धार असेल. तब्बल चार वर्षानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघात लढत होणार आहे. 2015 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0 ने पराभव पत्करावा लागला होता.

आसा आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ:

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, खालील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि राहुल चाहर.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), रस्सी व्हॅन डर ड्यूसेन (उपकर्णधार), टेंबा बावुमा, जुनिअर डाला, बोर्न फोर्टुइन, ब्युरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नॉर्टजे, अँडिले फेल्लुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस,कागिसो रबाडा, तबरायझ शमसी, जॉर्ज लिंडे.