IND vs SA 1st T20: कॉफी विद शिखर', रवि शास्त्री यांनी धवनला गुरु मंत्र देतानाचा 'हा' Photo केला शेअर, पहा
दक्षिण आफ्रिकाविरूद्ध धर्मशाळा येथे सुरू होणाऱ्या पहिल्या टी-20 मॅचपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सलामीवीर शिखर धवन याच्यासोबतचा एक फोटो शेअर केले आहे. शास्त्री यांनी धवनसोबत संवाद साधत असताना फोटो शेअर केले आहे. शास्त्रीने कॅप्शन दिले की, "कॉफी, डोंगर, क्रिकेट आणि शिखरशी संभाषण."
दक्षिण आफ्रिका (South Africa) विरूद्ध धर्मशाळा येथे सुरू होणाऱ्या पहिल्या टी-20 मॅचपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्यासोबतचा एक फोटो शेअर केले आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोसह कोच शास्त्री यांनी एक शानदार कॅप्शन दिला आहे. ज्यावर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. टीम इंडिया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना खेळण्यासाठी हिल स्टेशन 'धर्मशाला' सज्ज आहे. जेथे शास्त्री यांनी धवनसोबत संवाद साधत असताना फोटो शेअर केले आहे. शिखर आणि शास्त्री दोघेही टीम इंडियाचे नवीन प्रायोजक, बायजूचे टी-शर्ट परिधान केलेले दिसत आहेत आणि अतिशय गंभीरपणे चर्चा करीत आहेत. (Live Streaming of IND vs SA, 1st T20I Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)
या फोटोसह शास्त्रीने कॅप्शन दिले की, "कॉफी, डोंगर, क्रिकेट आणि शिखरशी संभाषण." धवनचा फॉर्म सध्या चांगला चालला नाही. ज्याबाबत कदाचित प्रशिक्षक रवि शास्त्री त्याच्याशी काही गंभीर संवाद साधताना दिसता आहेत. विश्वचषकमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅचनंतर शिखर भारतीय संघातून बाहेर आहे. शिवाय, वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याची बॅट शांत होती. टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौर्यावर शिखरच्या बॅटमधून तीन टी-20 सामन्यांत केवळ 26 धावा निघाल्या, तर त्याला दोन वनडे सामन्यात 38 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत फॉर्म गमावलेल्या शिखरला प्रशिक्षक शास्त्री यांच्याशी बोलल्यानंतर आपली लय परत मिळवण्यास आवडेल.
Coffee, Mountains, Cricket and Conversation - with @SDhawan25 🇮🇳 #TeamIndia #IndvSA pic.twitter.com/AaaW1BCG0A
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) September 15, 2019
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी -20 विश्वचषक स्पर्धेची तयारी भारतीय संघाने सुरू केली. अशा परिस्थितीत संघाच्या सलामीवीरची अनुपस्थिती टीम मॅनेजमेंटच्या कपाळावर चिंतेच्या रूपात दिसत आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेदेखील 2020 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठीची तयारी सुरू केली आहे. यामुळे त्याने अधिकाधिक तरुणांना संधी देण्याचे मन बनवले आहे. अशा परिस्थितीत, जर कसोटी क्रिकेटनंतर धवनचा फॉर्म लवकरच परतला नाही तर, पांढऱ्या बॉल गेममध्येही त्याला संघातून वगळले जाऊ शकते.
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2019 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

