Live Streaming of IND vs SA, 1st T20I Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
टी-20 मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.
वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरी धूळ चारल्यानंतर भारतीय संघ (India Team) आता दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाशी दोन हात करण्यास सज्ज आहे. भारत आणि आफ्रिका संघातील पहिला टी-20 सामना आज धर्मशाळा येथे खेळला जाईल. टी-20 मालिकेनंतर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. कर्णधारपदी विराट कोहली (Virat Kohli) कायम आहे तर मर्यादित षटकारांसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टेस्टसाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधारपदी कायम आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी-20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर टेस्टसाठी फाफ डुप्लेसी याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहेत. विश्वचषकमधील निराशाजनक कामगिरीनांतर आफ्रिका संघाचा पहिला दौरा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन्ही मालिका महत्वाची असणार आहे. (IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रोहित शर्मा याला 'हा' खास रेकॉर्ड करण्याची संधी)
टी-20 मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.
दुसरीकडे, टीम इंडियाने विंड़ीजविरुद्ध निर्विवाद वर्चस्व राखत यश मिळवलं आहे. विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात रोहितकडे सर्वांच्या नजरा असतील. विंडीजविरुद्ध रोहितला त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. म्हणून दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आपला जुना फॉर्म परत मिळवण्याचे रोहितचा निर्धार असेल. शिवाय, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याची देखील रोहितला संधी असेल. तर, कर्णधार विराट आणि रोहित यांच्यामधील नंबर एकची लढत पाहण्यासारखी असेल. रोहितने आजवर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत तर, विराट रोहितच्या काही धावांचं मागे आहे. त्यामुळे, यंदाच्या मालिकेत विराट रोहितच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2019 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

