IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रोहित शर्मा याला 'हा' खास रेकॉर्ड करण्याची संधी
(Photo Credit: AP/PTI Image)

रविवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरूद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला एका विक्रमला गवसणी घालण्याची संधी आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान रोहितची बॅट शांत होती. विंडीजविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेत रोहितला संतोषजनक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रविवारपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 घरच्या मालिकेत रोहित पुन्हा लय मिळवण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिली टी-20 मॅच धर्मशाळा येथे खेळली जाईल. टी-20 मॅचमध्ये रोहित आणि विराट कोहली यांच्या एकमेकांपेक्षा जास्त वरचढ होण्यासाठी स्पर्धा पहायाला मिळेल. दुसरीकडे, पहिल्या टी-20 मॅचमध्ये रोहितला ही वैयक्तिक रेकॉर्ड बनवण्याची संधी मिळणार आहे. (IND vs SA T20I Series: विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात रंगणार नंबर 1 ची लढत, जाणून घ्या)

रोहितच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत आणि त्याच्यामध्ये अजून एका विक्रमाची वाढ करण्याचा हिटमॅनचा प्रयत्न असेल. हिटमॅनच्या नावावर टी-20 मधील सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतक आणि सर्वाधिक षटकारांचा रेकॉर् आहे. आणि आता रोहित टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध सर्वाधिक धावा करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक 424 धावा केल्या आहेत. तर रोहितने 341 धावा केल्या आहे. रोहित गप्टिलच्या 84 धावा मागे आहे. आणि पहिल्या मॅचमध्ये या धावा करताच रोहित गप्टिलला मागे टाकत आफ्रिकाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.

दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करायचे असेल तर रोहितचा फॉर्म भारतासाठी निर्णायक असेल. भारतीय संघ आफ्रिका संघाला घरच्या मैदानावर एकदाही नमवू शकलेला नाही. 2015  मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत भारताने अखेरचा सामना खेळला होता. यामध्ये आफ्रिक ने 2-0 अशी मालिका जिंकली. यातील एक सामना रद्द करण्यात आला होता.