IND vs SA T20I Series: विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात रंगणार नंबर 1 ची लढत, जाणून घ्या
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credits: FIle Image)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिकेत समाधानकारक कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील. भारताला (Indian Team) दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्ध तीन टी -20 सामन्यांची मालिका तसेच तीन कसोटी सामने देखील खेळायचे आहेत. दोन्ही संघातील पहिला टी-20 सामना धर्मशाळा येथे खेळला जाईल. या टी-20 मालिकेदरम्यान सर्वांची नजर रोहित आणि विराट यांच्यावर असतील. विश्वचषकनंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये वाद असल्याचे बोलले जात होते. पण, दोन्ही क्रिकेटपटूंनी याबाबत स्पष्टीकरण देत अफवा सांगत या वृत्तांचे खंडन केले. आता दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आगामी टी-20 मालिकेत दोन्ही खेळाडूंमध्ये एक वेगळीच लढत पहाया मिळेल. (IND vs SA T20I: 15 सप्टेंबरपासून होणार भारत-दक्षिण आफ्रिका संघात लढत, कोण कोणाच्या वरचढ, पहा हे आकडे)

विश्वचषकमधील खराब कॅप्टन्सीमुळे विराटऐवजी रोहितला वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधार पद देण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली जात होती. त्यामुळे दोन्हीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण होईल याबाबत शर्यत सुरु झाली. आणि दोन्ही खेळाडूंमध्ये सुरु होणार आहे नुंबर 1 ची लढत. रोहित सध्या टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा नंबर एक फलंदाज आहे. आणि कोहली फक्त 53 धावा मागे आहे. रोहितने 88 डावांमध्ये 2422 धावा केल्या आहेत तर कोहलीने 65 डावांमध्ये 2369 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात रोहितला दणदणीत सुरुवात करायची आहे तर कोहली धाव घेतल्यास रोहितच्या जवळ येण्याची संधी मिळू शकते. आणि या मालिकेच्या अंतिम मॅचनंतर कोणता फलंदाज नंबर 1 वर पोहचतो हे पाहणे रोचक असणार आहे.

याशिवाय, रोहितने टी -20 मध्ये 17 अर्धशतके आणि चार शतके केली आहेत तर मध्ये कोहलीने 21 अर्धशतके ठोकली आहेत. दरम्यान, भारताने 2015 मध्ये घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अखेरची द्विपक्षीय मालिका खेळली होती आणि तीन सामन्यांची मालिका 2-0 आफ्रिकेने जिंकली होती तर, एक सामना रद्द झाला होता. भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय टक्केवारी 66.67 आहे. त्यांनी 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत.