धर्मशाळा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम  (Photo Credits: BCCI)

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना आज हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हवामान खात्याने यापूर्वी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. आणि आता सध्याच्या माहितीनुसार धर्मशाळामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मॅच सुरु होण्यास काही तासांचा अवधी राहिला, अशा परिस्थितीत पाऊस पडल्याने टॉस होण्यास उशीर झाला आहे. धर्मशाळेच्या विकेटबाबत बोलले तर हे मैदान वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल. दुसरीकडे, जर आजच्या सामन्या दरम्यान येथे पाऊस पडल्याने वेगवान गोलंदाज या विकेटवर अधिक धोकादायक ठरू शकतात. (IND vs SA 1st T20: कॉफी विद शिखर', रवि शास्त्री यांनी धवनला गुरु मंत्र देतानाचा 'हा' Photo केला शेअर, पहा)

सामन्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने धर्मशाळेच्या मैदानावरील फोटो शेअर केले होता. सामायिक केलेल्या फोटोत मैदानावर मान्सूनचे काळा ढग दिसू शकतात. हवामान खात्याने यापूर्वी पावसाची शक्यता वर्तवली असल्याकारणाने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-20 मॅचला पावसाचा फटका बसू शकतो.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघापुर्वी भारतीय संघाने जोरादर सराव केला आहे. नुकत्याच वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या टी-20 मालिकेत भारताने विंडीजचा 3-0 धुव्वा उडवला होता. तीच विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा निर्धार टीम इंडियाचा असेल. टी-20 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विराटला टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याची संधी असून तो अव्वल स्थानावर पोहोचू शकतो. तर रोहित हा 53 धावांच्या आघाडीसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे रोहित आणि विराटमध्ये जोरदार चूरस आहे.