IND vs NZ WTC Final 2021: विराट कोहलीने ज्या बॉलरवर लावला 15 कोटींचा डाव त्याने निर्णायक सामन्यात अडकवले जाळ्यात, यूजर्सने पाडला Memes चा पाऊस
काईल जेमीसन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाचा  (Indian Team) कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) अर्धशतक अवघ्या काही धावांनी हुकले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात काईल जेमीसनने (Kyle Jamieson) त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. विराट 68 व्या ओव्हरमध्ये जेमीसनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. विराटने रिव्ह्यू घेतला होता मात्र, त्यातही तो बाद असल्याचे दिसल्याने भारताला चौथा धक्का बसला. विराटने 132 चेंडूत 44 धावा केल्या. त्याचे अर्धशतक केवळ 6 धावांनी हुकले. जेमीसन आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला ज्याचे नेतृत्व कर्णधार विराट करत होता. (IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडविरुद्ध ही असेल स्पर्धात्मक धावसंख्या, टीम इंडिया ओपनर Shubman Gill ने केले जाहीर)

इतकंच नाही तर 2020 न्यूझीलंडच्या दौऱ्यावर देखील जेमीसन कोहलीला त्रास दिला होता आणि आता पुन्हा एकदा त्याने भारतीय कर्णधाराला आपल्या जाळ्यात अडकवले. जेमीसनचा चेंडू स्टॅम्पच्या लाईनवर पडून आतल्या बाजूला आला आणि कोहलीची बॅट चुकवून चेंडू बॅक पॅडवर आदळला. जेमीसनकडून जोरदार अपीलनंतर अंपायरने देखील भारतीय कर्णधाराला बाद घोषित केले. फिल्ड अंपायरच्या निर्णयावर विराटने रिव्यू घेतला पण तो त्याचा फायद्याचा ठरू शकला नाही. अशा परिस्थितीत कोहलीला पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये परतावे लागले. या दरम्यान यूजर्सने देखील सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडला.

युक्ती

आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यासाठी आरसीबी संघात जेमीसन सामील होतो तेव्हा... 

काईल जेमीसन

कोहली जॅमीसनची वाट पाहत आहे

जेमीसन विरुद्ध कोहली 

यादरम्यान, कोहली आणि जेम्ससनच्या आयपीएल 2021 शी संबंधित जुना किस्सादेखील कदाचित अनेकांना लक्षात येत असेल. आयपीएल 2021 दरम्यान टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तयारी करण्यासाठी जेमीसन ड्यूक बॉलने सराव करीत होता. या दरम्यान कोहलीने त्याला नेट्समध्ये ड्यूक बॉलने गोलंदाजी करण्यास सांगितले पण जेमीसनने नकार दिला आणि आता त्याच गोलंदाजाने विराटची शिकार केली. जेमीसनला आरसीबीने तब्बल 15 कोटी रुपयांत लिलावात खरेदी केले होते.