IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडविरुद्ध ही असेल स्पर्धात्मक धावसंख्या, टीम इंडिया ओपनर Shubman Gill ने केले जाहीर
शुभमन गिल (Photo Credit: Facebook)

IND vs NZ WTC Final 2021: भारतीय संघाचा (Indian Team) सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) म्हणाला की न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या निर्णायक सामन्यात जर त्याच्या संघाने 300 च्या वर धावा केल्या तर ती खरोखर स्पर्धात्मक असेल. सध्या सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलच्या (WTC Final) तिसऱ्या दिवसाचा खेळ 30 मिनिटं उशीराने झाला. “मला वाटते की आम्हाला एकूण 300 पेक्षा अधिक धावा मिळाल्या तर ती आमच्यासाठी खरोखर स्पर्धात्मक धावसंख्या असेल. मी खरोखर चांगली सुरुवात केली, परंतु मला पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणे आवडेल. जेव्हा आम्हाला फलंदाजीला सांगण्यात आले तेव्हा परिस्थिती आमच्या विरोधात होती पण मला असे वाटते की आम्ही चांगले काम केले. शेवटी, हे सर्व धावा काढण्याइतकेच आहे, म्हणून जेव्हा संधी दिली जाते तेव्हा धावा करण्याचा हेतू असणे महत्त्वाचे होते, ” गिलने मुख्य ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सला सांगितले. (IND vs NZ WTC Final 2021: दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची न्यूझीलंडला चेतावणी, टीम इंडियाने इतक्या धावा केल्या तर गेम ओव्हर!)

मूलतः 18 जूनपासून कसोटी अजिंक्यपदाचा निर्णायक फायनल सामना रंगणार होता पण पावणे अडथला आणला आणि संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी अखेर सामन्याला सुरुवात झाली आणि किवी संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गिलने पहिल्या डावात 28 धावांची खेळी साकारली, पण नील वॅग्नरने त्याला दुसर्‍या दिवशी पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. गिलने भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या साथीने टीमला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. पभारताला सुरुवात चांगली मिळाली तरी अवघ्या 18 धावांमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्याने भारतीय संघ बॅकफुटवर ढकलला गेला होता. परंतु कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळ करत डाव सावरला.

साऊथॅम्प्टन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत किंवा न्यूझीलंड नाही तर हवामानाचे वर्चस्व दिसून येत आहे. याच कारणामुळे किवी संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीपटूचा समावेश न करता पाच वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे तर दुसरीकडे, भारतीय संघात रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विनच्या रूपात दोन फिरकी गोलंदाज आहेत.