भारत-न्यूझीलंड WTC फायनल (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: भारताविरुद्ध (India) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप  (World Test Championship) फायनल सामन्यासाठी न्यूझीलंड (New Zealand) संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही फिरकीपटूला संधी न देता पाच वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. किवी संघाच्या या रणनीतीने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने (Shane Warne) निराश झाला आणि त्याने न्यूझीलंडला चेतावणी देत पोस्ट शेअर केली. मूलतः 18 जूनपासून सुरु होणार आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा निर्णायक सामना पावसामुळे आतडं दुसऱ्या दिवसापासून खेळण्यास सुरुवात झाली. किवी कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. भारतीय संघाने (Indian Team) सामन्यापूर्वीच आपला प्लेइंग इलेव्हन घोषित केला होता, पण न्यूझीलंड संघाने तसे केले नाही आणि टॉसपर्यंत अंतिम-11 खेळाडूंना पद्यात ठेवले.

“अतिशय नाराज. न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फिरकीपटू म्हणून खेळवत नाही, कारण या विकेटवर फिरकीची गरज होईल कारण मोठ्या पायाच्या खुणाने विकसित होत आहे. लक्षात ठेवा, ते स्पिन होईल असे वाटत असल्यास. भारत 275/300 पेक्षा अधिक धावा केल्यास पाऊस आल्यास सामना संपला!” वॉर्नने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले. विशेष म्हणजे टीम इंडियाने सामन्यापूर्वी घोषित केलेल्या 11 खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन अशा स्टार फिरकी गोलंदाजानाचा समावेश आहे आणि जर वॉर्नने म्हटल्याप्रमाणे जे खेळपट्टी स्पिन गोलंदाजांची प्रभावी ठरली तर भारताला याचा मोठा फायदा होईल आणि किवी संघ बॅकफूटवर ठाकला जाईल.

विराटची टीम इंडिया आणि विल्यमसनच्या ब्लॅककॅप्स संघातील विजेतेपदाचा निर्णायक सामना 18 जूनपासून सुरु होणार होता परंतु साऊथॅम्प्टनमध्ये पावसाचा खेळ सुरु राहिल्यामुळे क्रिकेटचा खेळ सुरु करता आला नाही. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी या सामन्याला सुरुवात करण्यात आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आज 98 ओव्हर खेळवली जाणार आहेत. तसेच पावसामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे सामन्यात व्यत्यय आला किंवा सामन्याचा निकाल लागू शकला नाही, तर आयसीसीने 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे आणि पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेल्यामुळे हा सामना 23 जूनपर्यंत खेळवला जाऊ शकतो.