Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजता होणार आहे. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा 113 धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंडने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. यासह न्यूझीलंड संघाने नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली आहे. टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करून आपली इज्जत वाचवायची आहे. तर, न्यूझीलंडचा संघ क्लीन स्वीपच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज बुमराह हा खेळणार नसून त्याऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. (हेही वाचा - India vs New Zealand 3rd Test 2024 Preview: तिसऱ्या कसोटीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार चुरशीची लढत, त्याआधी येथे जाणून घ्या हेड टू हेड, स्ट्रीमिंगस संपूर्ण माहिती )
पाहा पोस्ट -
3rd TEST. New Zealand won the toss and elected to bat.https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 1, 2024
दरम्यान पुण्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारत मुंबईतील आणखी एक टर्निंग पीच निवडेल अशी अपेक्षा आहे. मात्र, मुंबईची खेळपट्टी साधारणपणे त्याच्या उसळीसाठी ओळखली जाते. जिथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे उघड झाले आहे की मालिकेच्या अंतिम कसोटीसाठी “स्पोर्टिंग ट्रॅक” तयार केला जाईल. अशा परिस्थितीत स्पोर्टिंग ट्रॅक तयार केल्यास सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळू शकते.
पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग XI
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, ईश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल, विल्यम ओ'रुर्के.
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट टीम: यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज