IND vs NZ 2020: टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी तयारी सुरु, विराट कोहली ने शेअर केला तंदुरुस्त खेळाडूंच्या ग्रुपसोबतचा 'हा' फोटो
विराट कोहली आणि त्याचे सहकारी (Photo Credits: instagram.com/virat.kohli)

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचा (New Zealand) सामना करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) ऑकलँडमध्ये दाखल झाला आहे. पाच टी-20 मालिका आणि त्यानंतर तीन वनडे मालिकेसह भारताच्या दौऱ्याची सुरुवात होईल. आणि त्यानंतर हा दौरा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसह संपेल. भारत आणि न्यूझीलंडमधील टी-20 मालिका 24 जानेवारीपासून सुरु होईल. 2020 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि संघाचा हा पहिलाच परदेश दौरा असून संघ त्याबद्दल उत्सुक आहे. यापूर्वी भारतीय कर्णधार कोहलीने 24 जानेवारीला ऑकलँडमध्ये (Auckland) सुरु होणाऱ्या मालिकेच्या पहिल्या सामन्याची तयारीसाठी कशी करत आहे याची माहिती दिली. ऑकलंडमध्ये असलेल्या यशस्वी जिम सत्रानंतर कोहलीने बुधवारी सकाळी ट्विटरवर जेवणाच्या वेळी सध्याच्या भारतीय संघातील फिट ग्रुप-मनीष पांडे, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांच्यासह फोटो शेअर केला. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी नेट्समध्ये सराव करण्याआधी उत्तम जिम सत्रानंतर एकत्र जेवणाचा आनंद लुटला. (न्यूझीलंड दौऱ्याच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; पृथ्‍वी शॉ, संजू सॅमसन यांना संधी)

कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सेल्फी पोस्ट केली असून यात अष्टपैलू रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि मनीष पांडे आहेत. रन-मशीन कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले की,"उत्तम टीम जिम सत्रानंतर ऑकलंडमध्ये चांगले जेवण.” पाहा विराटची पोस्ट:

न्यूझीलंड दौऱ्यातून संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला टी-20 आणि वनडे मालिकेतून बाहेर केल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात फिल्डिंग करताना धवनच्या खांद्याला दुखापत झाली होती. धवनच्या जागी संदीप सॅमसनला टी-20 संघात स्थान देण्यात आले तर पृथ्वी शॉला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. टी-20 मालिका 2 फेब्रुवारी रोजी संपेल. तीन एकदिवसीय सामने 5, 8 आणि 11 फेब्रुवारीदरम्यान खेळल्या जातील. टीम इंडियाच्या या दौऱ्याला टी-20 विश्वचषकच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहे.