न्यूझीलंड दौऱ्याच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; पृथ्‍वी शॉ, संजू सॅमसन यांना संधी
Shikhar Dhawan (Photo Credits: IANS)

भारताच्या न्यूझीलंडच्या (New Zealand) दौर्‍यासाठी, 5 सामन्यांच्या टी -20 (T-20) आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी (ODI) टीम इंडिया (Team India) ची घोषणा करण्यात आली आहे. टी -20 मालिकेसाठी शिखर धवनच्या जागी युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची निवड झाली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्‍या वनडे संघात बदल झाला असून, धवनच्या जागी युवा सलामीवीर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे.

खांद्याच्या दुखापतीमुळे शिखर धवन भारतीय संघातून बाहेर आहे. बीसीसीआयने (BCCI) यापूर्वी टी-20 संघ जाहीर केला होता. आज एकदिवसीय संघ जाहीर करण्यात आला आहे. याद्वारे शॉ 1 वर्षानंतर भारतीय संघात परतला आहे.

रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरु येथे झालेल्या तिसर्‍या वनडे सामन्यात, क्षेत्ररक्षण करताना सलामीवीर शिखर धवन जखमी झाला होता. त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. पृथ्वी शॉ सध्या भारत 'ए' संघासह न्यूझीलंड दौर्‍यावर असून, त्याने शतकही झळकवले आहे. एकदिवसीय संघात प्रथमच त्याला संधी देण्यात आली आहे. याक्षणी त्याने भारतासाठी फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. पृथ्वी शॉ हा भारतीय एकदिवसीय संघातील एक नवीन चेहरा आहे.

संघात वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखाली, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांच्या खांद्यावर असेल. (हेही वाचा: शिखर धवननंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का; न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी इशांत शर्मा च्या खेळण्यावर संशय)

न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मो. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठकुल, केदार जाधव.

न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली, रोहित शर्मा, संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मो. शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर.