IND vs NZ 2020: शिखर धवननंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का; न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी इशांत शर्मा च्या खेळण्यावर संशय
ईशांत शर्मा (Photo Credit: IANS)

दिल्लीच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेदरम्यान सोमवारी विदर्भाविरुद्ध झालेल्या सामन्यात पायाला दुखापत झाल्यानंतर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याचा आगामी न्यूझीलंड (New Zealand) दौर्‍यासाठी भारतीय संघात (Indian Team) समावेश होणे संशयास्पद आहे. विदर्भाचा कर्णधार फैज फाजल याच्याविरूद्ध लेग-अपीलचं अपील  करताना इशांतला दुखापत झाली. बॅक पेडलिंग करताना स्पीडस्टरने त्याचा पाय मुरडला ज्यामुळे त्याला वेदना जाणवत होता. रणजीच्या सामन्याच्या वेळी खेळपट्टीवर पडल्यानंतर इशांतला त्याच्या उजव्या घोट्यावर ग्रेड 3 ची दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे, 21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दोन सामन्यांची कसोटी मालिकेला त्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे. सोमवारी खेळल्यानंतर 96 कसोटी सामने खेळणारा भारताचा अनुभवी गोलंदाज एमआरआयसाठी गेला, ज्याचा अहवाल मंगळवारी आला. बीसीसीआय (BCCI) कडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेले नाही आणि नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) इशांतच्या दुखापतीबाबत अंतिम निर्णय घेतील. (IND vs NZ 2020: भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातून शिखर धवन Out, बीसीसीआय लवकरच करणार बदली खेळाडूची घोषणा, वाचा सविस्तर)

इशांतचे टेस्ट मालिकेसाठी भारतीय संघातून बाहेर पडणे हे संघाला मोठा धक्कादायक ठरू शकते. गेल्या 2 वर्षांपासून त्याने संघासाठी नियमित गोलंदाजी केली आहे. या कारणास्तव, त्याचे न खेळणे संघासाठी समस्या निर्माण करू शकतात. भारतीय संघाने 2009 आणि 2014 मध्ये न्यूझीलंडमध्ये कसोटी सामने खेळले होते. दोन्ही मालिकांमध्ये इशांत भारतीय संघाचा सदस्य होता. इशांतपूर्वी, सलामी फलंदाज शिखर धवनच्या रूपात पहिला धक्का बसला. वनडे आणि टी-20 शिखरच्या खेळण्यावर संशय निर्माण झाला आहे.

भारतीय संघाला पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळायची आहे. यासाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत भारतीय संघासाठी ही मालिका कठीण आव्हान असेल. न्यूझीलंडमध्ये खेळताना 2009 नंतर भारतीय संघाने येथे कोणताही कसोटी सामना जिंकलेला नाही.