अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा सफाया केल्यावर आता कसोटी मालिकेत  टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीवर सर्वांची नजर असेल. कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क येथे पहिला सामना रंगणार असून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाचे नेतृत्व करेल. रोहितला संपूर्ण मालिकेतून सुट्टी देण्यात अली आहे तर विराट कोहली फक्त दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे कर्णधार रहाणे समोर संघाचा प्लेइंग इलेव्हन निवडणे मोठी डोकेदुखी ठरणार आहे. काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे, परंतु परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंच्या फलंदाजीच्या स्थितीतही बदल होण्याची अपेक्षा आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड तसेच कर्णधार रहाणे यांना कानपूरमधील मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी काही कठीण आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. (IND vs NZ Kanpur Test: रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कसा असे भारतीय फलंदाजी क्रम? माजी ओपनरने वर्तवले भाकीत)

1. कशी असेल सलामी जोडी?

रोहित शर्मा मालिकेतील दोन्ही सामने खेळणार नाही आहे. व्हाईट-बॉल फॉर्मेटप्रमाणेच भारताकडे दोन ओपनिंग स्पॉट्ससाठी भरपूर पर्याय आहेत. केएल राहुल (KL Rahul), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुबमन गिल (Shubman Gill) सलामीवीर आहेत पण त्यापैकी फक्त दोघांनाच संधी मिळेल. मयंक आणि शुबमन यांच्यातील एक राहुलसोबत सलामीला उतरू शकतो. अलीकडे, शुभमनला मधल्या फळीत हलवण्याच्या चर्चा सुरु होता आणि या क्षणी या समस्येचे वास्तववादी समाधान होताना दिसू शकते.

2. श्रेयस अय्यर की शुभमन गिल?

कोहलीच्या गैरहजेरीमुळे मधल्या फळीत जागा रिकामी झाली आहे. गिल किंवा अय्यर यापैकी एकाला ही जागा मिळू शकते. जर संघ व्यवस्थापन गिलला मधल्या फळीत उतरवण्याचा विचार करत असेल तर त्याला अय्यरच्या पुढे संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, जर गिलकडे केवळ सलामीवीर म्हणून म्हणून पाहिले जात असेल, तर अय्यरकडे जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या दीर्घकालीन बदलीच्या शोधात असलेल्या निवडकर्त्यांसाठीही परिस्थिती महत्त्वाची आहे.

3. गोलंदाजी संयोजन कसे असेल?

कानपूर कसोटीसाठी भारताने किती फिरकीपटू निवडावे याची अखेरपर्यंत चर्चा होईल. आणि ग्रीन पार्क येथील खेळपट्टीचे स्वरूप पाहिल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध खरोखरच चांगली कामगिरी केली होती पण रवींद्र जडेजा व अश्विन ही भारताची फिरकी गोलंदाजीची जोडी आहेत. अश्विनला इंग्लंड दौऱ्यावरील कोणत्याही सामन्यात संधी मिळाली नाही त्यामुळे किवींविरुद्ध त्याला स्थान मिळण्याची आहे. दुसरीकडे, दुसरीकडे, संघातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जडेजाचे फलंदाजीतील योगदानही खूप महत्त्वाचे असेल. अशा परिस्थितीत भारत तीन फिरकीपटू आणि मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा या दोन वेगवान गोलंदाजांना संघात समावेश करू शकते.