
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) या कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे, तर कर्णधार विराट कोहलीही दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात (Team India) सामील होणार आहे. या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची फलंदाजी क्रम कसा असेल याचीच सध्या चर्चा रंगली आहे. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सांगितले की, रोहितच्या जागी कोणत्या फलंदाजाने डावाची सुरुवात करावी आणि चौथ्या क्रमांकावर कोणी फलंदाजी करावी. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि केएल राहुल (KL Rahul) - या कर्नाटकी जोडीने भारतासाठी सलामीला उतरावे अशी इच्छा गंभीरने व्यक्त केली आहे. जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड साउथहॅम्प्टन येथे अखेरच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदा कसोटी मालिकेत भिडणार आहेत. (Gautam Gambhir On Ravi Shastri: गौतम गंभीरची रवी शास्त्रीवर टिका, रवी शास्त्री फक्त बढाई मारणारा माणुस)
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह शोमध्ये गंभीर म्हणाला, “मयंक अग्रवालने रोहितऐवजी केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करावी. राहुल इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत सलामीला उतरला होता. तसेच मला शुभमन गिलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला आवडेल. अजिंक्य रहाणे आत्तापर्यंत संघाचा भाग म्हणून खूप भाग्यवान आहे. इंग्लंडमध्ये त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यानंतर संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही मोठी बाब आहे. पण मला वाटते की या संधीचा फायदा त्याला नक्कीच आवडेल.” दुखापतींमुळे इंग्लंड कसोटी मालिकेला मुकल्यानंतर शुभमन आणि मयंकचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. यामुळे राहुलला सलामीला संधी मिळाली आणि कर्नाटकच्या फलंदाजाने संधीचा फायदा करून घेत आठ डावांत 39.8 च्या सरासरीने 315 धावा केल्या आणि लॉर्ड्स ऑनर्स बोर्डवर 129 धावांसह नाव नोंदवले.
दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांमध्ये हनुमा विहारीला न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो भारत अ संघाचा भाग बनला आहे. गंभीरने विहारीला वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारताच्या मधल्या फळीत रहाणेसाठी हैदराबादचा फलंदाज भविष्यात बदली ठरू शकेल असा विश्वास वर्तवला आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर मंगळवारी भारताचा पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव सत्राला सुरुवात करेल.