IND vs NZ 1st Test Day 2: खराब प्रकाशामुळे थांबला सामना, दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडनी घेतली 51 धावांची आघाडी
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Twitter/ICC)

वेलिंग्टनमध्ये भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) मधील पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आलेल्या दुसर्‍या दिवसाच्या सामन्यात न्यूझीलंडने 51 धावांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापूर्वी किवी गोलंदाजांनी वर्चस्व कायम ठेवत भारताला फक्त 165 धावांवर ऑलआऊट केले. संघाकडून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 46, मयंक अग्रवाल 34, मोहम्मद शमी 21 आणि रिषभ पंत यांनी 19 धावा केल्या. न्यूझीलंडच्या काईल जैमीसन (Kyle Jamieson) आणि टिम साऊथी यांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. जैमीसनने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहेत. रहाणेने 138 चेंडूंच्या डावात 5 चौकार ठोकले. इशांत शर्मा (Ishant Sharma) बरोबर मोहम्मद शमीने 9 व्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बीजे वॅटलिंग (BJ Watling) आणि कॉलिन डी ग्रैंडहोम (Colin de Grandhomme) अनुक्रमे नाबाद 14 आणि 4 धावा करून खेळत आहेत. दिवसाखेर किवी संघाने 5 विकेट गमावून 216 धावा केल्या. किवी कर्णधार केन विल्यमसन 89 आणि रॉस टेलर 44 धावा करून आऊट झाले. (IND vs NZ 1st Test: रॉस टेलर ने टाकले विराट कोहली ला मागे, टेस्ट क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा)

नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया पहिले फलंदाजीला उतरली आणि त्यांचे आघाडीचे फलंदाज किवी गोलंदाजसमोर फेल झाले. पहिल्या दिवशी भारताने पाच विकेट गमावून 122 धावा केल्या. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना धावसंख्येत फक्त 43 धावांची भर घालता आली. दुसर्‍या दिवशी लंचला जाण्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाने विकेट न गमावता 17 धावा केल्या होत्या. दुपारच्या जेवणानंतर इशांतने लाथमची विकेट घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. लाथमने 30 चेंडूत 11 धावा केल्या. यानंतर इशांतने ब्लंडेलला बोल्ड करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने 80 चेंडूत 30 धावा केल्या. इशांतऐवजी दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि मोहम्मद शमीला (Mohammed Shami) विकेट मिळाली.  शमीला किवी कर्णधाराची महत्तवपूर्ण विकेट मिळाली. विल्यमसनने तिसर्‍या विकेटसाठी टेलरसह 93 धावांची भागीदारी केली आणि टीमला आघाडी मिळवून दिली. टेलरचा हा 100 वा सामना आहे. विल्यमसनने 93 चेंडूंत 6 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताविरुद्धचे हे त्याने 17 वे कसोटी अर्धशतक आहे. या अर्धशतकाच्या जोरावर त्याने रॉस टेलरच्या भारताविरुद्ध सर्वाधिक 17 अर्धशतकांची बरोबरी केली आहे.

सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे फक्त 55 ओव्हरचा खेळ झाला. मयंक अग्रवाल 34, पृथ्वी शॉ 16, चेतेश्वर पुजारा 11, विराट कोहली 2 आणि हनुमा विहारी 7 धावांवर बाद झाले. सामन्यात अजून तीन दिवसाचा खेळ बाकी आहेत. न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व ठेवले आहे आणि त्याच्याकडे सात विकेट बाकी आहेत.