भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. टीम इंडियाला (Team India) कानपूर कसोटी (Kanpur Test) जिंकण्याची चांगली संधी होती, पण ते विजयापासून एक विकेट दूर राहिले. एजाज पटेल आणि रचिन रवींद्रची (Rachin Ravindra) जोडी अंतिम क्षणापर्यंत विकेटवर उभी राहिल्याने टीम इंडियाची विजयाची संधी हिरावली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांची गरज होतेय पण संघ पाचव्या दिवसाखेर 9 गडी गमावून 165 धावाच करू शकला. भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आणि आर अश्विनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या दोघांशिवाय अक्षर पटेल आणि उमेश यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. सामन्याच्या पाचव्या दिवशी अजिंक्य राहणेचा भारतीय संघ विजेच्या उंबरठ्यावर होता, पण फक्त काही किवी खेळाडूंच्या चिवट खेळीमुळे त्यांना दिवसाखेरीस ड्रॉ-वर समाधान मानावे लागले. यामध्ये सर्वात आघाडीवर नाईट-वॉचमन विल सोमर विलचे नावे येते. (IND vs NZ 1st Test Draw: टीम इंडियाच्या अथक प्रयत्नानंतरही न्यूझीलंड संघाला कानपुर कसोटी अनिर्णित ठेवण्यात यश)
विल्यम सोमरविल (William Somerville)
भारताच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सोमरविल नाईट-वॉचमन म्हणून फलंदाजीला उतरला होता. पाचव्या दिवशी सोमरविलने किवी सलामीवीर टॉम लॅथमला चांगली साथ दिली आणि अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. दोघांमधील 76 धावांची भागीदारी संघासाठी निर्णायक ठरली. त्याने 36 धावांचे छोटेखानी योगदान दिले.
टॉम लाथम (Tom Latham)
न्यूझीलंडचा हा अनुभवी सलामीवीर टीम इंडियाला संपूर्ण सामन्यात नडला. पहिल्या डावात त्याने सार्वधिक 95 धावा ठोकल्या तर दुसऱ्या डावात देखील त्याने आपली लय कायम ठेवली आणि संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना करून मूल्यवान 52 धावा ठोकल्या.
Batted mate. #INDvNZ pic.twitter.com/aXDUdvhezp
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 29, 2021
रचिन रवींद्र (Rachin Ravindra)
रवींद्रने कानपुरमध्ये भारताविरुद्ध सामन्यातून कसोटीत पदार्पण केले. रचिनला दोन्ही डावात बॉलने प्रभावी खेळी करता आली नाही. याशिवाय पहिल्या डावात तो 13 धावाच करू शकला. मात्र दुसऱ्या डावात सामन्याच्या पाचव्या दिवशी दबावाच्या परिस्थितीत फलंदाजीला येत रवींद्रने स्थिरतापूर्ण फलंदाजी केली आणि न्यूझीलंडला सामना अनिर्णित करण्यात मोलाची भूमिका बजावली. रचिन रवींद्र 18 धावा करून नाबाद परतला.