भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

IND vs NZ Series 2021: यजमान भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील द्विपक्षीय टी-20 मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर किवी संघ थेट भारतात पोहोचला आहे आणि आता भारतीय संघ (Indian Team) त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर आव्हान देईल. पहिला टी-20 सामना ‘गुलाबी नगरी’ जयपूरच्या (Jaipur) सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर आजपर्यंत एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नव्हता. पण 11 वर्षांपूर्वी या दोन संघांमध्ये याच मैदानावर एकदिवसीय सामना नक्कीच रंगला होता. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) बुधवारी भारत आणि न्यूझीलंड संघ पहिला टी-20 सामना खेळतील तेव्हा त्यांच्याकडे या खेळपट्टीशी संबंधित जुने आकडे नसतील. जे जेव्हा होईल तेव्हा होईल. मात्र, 11 वर्षांपूर्वी 2010 मध्ये येथे दोन्ही संघांमध्ये वनडे सामना नक्कीच खेळला गेला होता. त्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात काय घडले जाणून घ्या. (IND vs NZ 1st T20I: रोहितच्या नेतृत्वात न्यूझीलंडशी भिडणार ‘हिटमॅन आर्मी’, 2 युवा धुरंधर Playing XI मध्ये करु शकतात पदार्पण)

त्या एकदिवसीय सामन्यात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला होता. मनोरंजक बाब म्हणजे भारतीय संघातील एकच खेळाडू आहे जो अजूनही सध्याच्या भारतीय टी-20 संघाचा भाग आहे. तो म्हणजे रविचंद्रन अश्विन आहे. त्या सामन्यातील खेळाडूंमध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोणताही खेळाडू सक्रिय नाही. तसेच, न्यूझीलंड त्या संघातील सध्याच्या संघात फक्त मार्टिन गप्टिल, आणि टिम साऊदी हेच संघाचा भाग आहेत. 1 डिसेंबर 2010 रोजी भारत आणि न्यूझीलंडचा संघ वनडे सामन्यात किवी संघ पहिले फलंदाजीसाठी उतरला होता. सलामीवीर गप्टिलने 70 तर माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिसने 59 धावा केल्या आणि न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 258 धावा केल्या. यादरम्यान माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने 4 विकेट घेतल्या. तसेच मुनाफ पटेल, अश्विन आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

259 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाचा सलामीवीर आणि कर्णधार गंभीरने ऐतिहासिक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. गंभीरने 116 चेंडूत 18 चौकारांसह नाबाद 138 धावांची ठोकल्या. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मुरली विजयने 33, विराट कोहलीने 64 धावा केल्या. शेवटी युवराज सिंह (नाबाद 16) गंभीरसह खेळपट्टीवर उपस्थित होता आणि भारताने 43 षटकांत केवळ 2 गडी गमावून एकतर्फी विजय मिळवला. किवी संघाकडून माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी आणि अँड्र्यू मॅके यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसरीकडे, या स्टेडियमवर 2013 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. हा एक वनडे सामना होता ज्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने पराभव केला होता. उच्च धावसंख्येच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 360 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना उच्च धावसंख्येचा असेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.