रोहित शर्मा आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

India Likely Playing XI vs NZ: आयसीसी टी-20 विश्वचषकमधील पराभवानंतर, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) 17 नोव्हेंबरपासून मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) निराशाजनक आठवणींना मागे ठेवून नवीन सुरुवात करू पाहत असतील. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) दरम्यान झालेल्या पराभवाच्या जखमा ताज्या असतीलच आणि टीम इंडिया (Team India) हिशोब चुकता करू इच्छित असेल. विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांसारख्या मोठ्या नावांच्या अनुपस्थितीत किवींविरुद्ध मालिकेच्या संलमीच्या सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या मोसमात जबरदस्त खेळ केलेल्या व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer), हर्षल पटेल आणि आवेश खान (Avesh Khan) यासारख्या IPL स्टार खेळाडूंना सवाई मानसिंह स्टेडियमवरील पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी XI मध्ये निवडले जाऊ शकते. (IND vs NZ Series 2021: टी-20 मालिकेतून केन विल्यमसन आऊट, पहिल्या सामन्यात Tim Southee कडे नेतृत्वाची धुरा)

न्यूझीलंड विरोधात मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारत कॅप्टन रोहित शर्मा व उपकर्णधार केएल राहुलच्या सलामी जोडीसह कायम राहण्याची शक्यता आहे. तर श्रेयस अय्यर माजी टी-20 करणदाहर विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसेच सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज असतील.  उल्लेखनीय आहे की श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव- दोघेही मधल्या फळीतील फलंदाज - इलेव्हनमध्ये असू शकतात. व्यंकटेश अय्यरला अष्टपैलू म्हणून संधी दिली जाईल जो गोलंदाजी  देखील करेल. आयपीएलमधील अय्यरच्या जबरा कामगिरीमुळे त्याला भारतासाठी पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय युजवेंद्र चहल यालाही इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

बुमराह आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. रविचंद्रन अश्विन फिरकी विभागाचे नेतृत्व करेल. भूविसोबत मोहम्मद सिराज आणि आवेश खान वेगवान गोलंदाजी हल्ल्याची जबाबदार सांभाळू शकतो.

न्यूझीलंड विरुद्ध भारताचा संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि आवेश खान.