न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) बुधवारपासून जयपूर येथे सुरू होणाऱ्या भारताविरुद्ध (India) आगामी तीन टी-20 सामन्यांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यमसनला 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे विल्यमसनने हा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ वेगवान गोलंदाज टिम साऊदी (Tim Southee) व्हाईट बॉल मालिकेत ब्लॅककॅप्सचे नेतृत्व करेल, असे न्यूझीलंड क्रिकेटने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)