भारतीय (India) अंडर-19 संघाने दक्षिण आफ्रिकामध्ये सुरु असलेल्या युवा विश्वचषकच्या (World Cup) आजच्या जपान (Japan) विरुद्ध सामन्यात विरोधी संघाला 41 धावांवर ऑलआऊट केल्या मिळालेल्या 42 धावांचे लक्ष्य 4.5 ओव्हरमध्ये गाठले. टीम इंडियाकडून सलामी जोडी यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि कुमार कुशाग्र (Kumar Kushagra) अनुक्रमे 29 आणि 13 धावांवर नाबाद परतले. यापूर्वी, भारतीय संघाने (Indian Team) नाणेफेक जिंकून प्रथम जपानला फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि संपूर्ण संघाला 41 धावांवर गुंडाळले. जपान अंडर-19 संघाने 22.5 षटकांत 41 धावा केल्या. 19 वर्षांखालील खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात कमी धावसंख्यापैकी एक आहे. जपानविरुद्ध विजयासह भारताने क्वार्टर फाइनलमधेही प्रवेश निश्चित केला आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय होता. रवी बिश्नोईने भारतासाठी जोरदार गोलंदाजी करत 8 षटकांत तीन मेडन ओव्हर टाकून केवळ पाच धावा दिल्या आणि चार गडी बाद केले. वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी याने 3, आकाश सिंह याने 2 आणि विद्याधर पाटील ने 1 गडी बाद केला. (IND vs JPN U19 World Cup 2020: रवी बिश्नोई सह भारतीय गोलंदाजांनी केला कहर, जपान 41 धावांवर ऑलआऊट)
जपानकडून सलामीचा फलंदाज शु नोगुचि आणि आठव्या क्रमांकाचा फलंदाज केंटो डोबेलने सर्वाधिक 7-7 धावा केल्या. जपानचे एकूण5 फलंदाज शून्यावर बाद झाले. एका वेळी जपानने 19 धावांवर 7 गडी गमावले होते. डोबेल आणि मॅक्सिमेलेन क्लेमेंटने 8 व्या विकेटसाठी 13 धावांची भागीदारी केली, जी जपानच्या डावातील ही सर्वात मोठी भागीदारी होती. कर्णधार मार्कस थुरगेट 1 धावांवर बाद झाला.
Two games two wins for India 👏 #U19CWC | #INDvJPN | #FutureStars pic.twitter.com/7rQbtgRaKY
— Cricket World Cup (@cricketworldcup) January 21, 2020
दरम्यान, जपानचा 41 धावांचा साकोरे अंडर-19 विश्वचषकात कोणत्याही संघाने संयुक्तपणे बनविलेले दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी, कॅनडा आणि बांग्लादेश 41-41 धावांवर ऑलआऊट झाले होते. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम स्कॉटलंडच्या नावर आहे. 2004 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी फक्त 22 धावा केल्या होत्या. जपानच्या संघाचा एकाही फलंदाज दाहीचा आकडाही स्पर्श करु शकला नाही. जपान हा पहिल्यांदा अंडर-19 विश्वचषक खेळत आहे.