19 वर्षांखालील सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषकात (World Cup) आज भारत (India) आणि जपान (Japan) यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी कहर केला. जपानची सुरुवात खराब झाली. त्यांचे 7 खेळाडू फक्त 19 धावांवर आऊट झाले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जोरदार कामगिरी करत जपानला 41 धावांवर ऑलआऊट केले आणि आता गेटजेत्या संघाला जिंकण्यासाठी धावांची 42 गरज आहे. भारतीय गोलंदाजीसमोर जपान संघ 22.5 ओव्हरपर्यंत टिकला. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. कार्तिक आणि बिश्नोईने सलग दोन चेंडूत दोन गडी बाद केले. जपानचे पाच फलंदाज भोपळाही फोडला नाही. कार्तिकने 3, तर बिश्नोईने जपानच्या चार फलंदाजांना पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. आकाश सिंह 2 आणि विद्याधर पाटील यांनी प्रत्येकी 1 गाडी बाद केला. जपान प्रथमच अंडर-19 विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. शु नोगुचि आणि केंटो डोबेल यांनी जपानसाठी सर्वात जास्त 7 धावा केल्या. भारताने आधीच पहिल्या सामान्यत श्रीलंकेवर 90 धावांनी विजय मिळवला होता. (IND U19 vs JPN U19 World Cup 2020 Live Streaming: भारत अंडर-19 विरुद्ध जपान अंडर-19 विश्वचषक लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर)
टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करत कार्तिकने पहिले जपानचा कर्णधार मार्केट थुरगेटला 1, नील दातेला शून्यावर बाद केले. त्यानंतर बिश्नोईने शु नागोची (7) आणि काजुमाशा ताकाहाशी (0) च्या विकेट घेतल्या. बिशनोईने ईशानला बाद करुन तिसरे यश मिळवले. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. दिव्यांश सक्सेना, शुभम हेगडे आणि सुशांत मिश्रा यांच्याऐवजी प्लेयर इलेव्हनमध्ये कुमार कुशाग्र, शाश्वत रावत आणि विद्याधर पाटील यांना स्थान मिळाले आहे.
India bowl Japan out for 41!
Ravi Bishnoi the star recording figures of 8-3-5-4 🔥 #U19CWC | #INDvJPN | #FutureStars pic.twitter.com/XoPc3lQk3v
— Cricket World Cup (@cricketworldcup) January 21, 2020
यापूर्वी, रविवारी झालेल्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 90 धावांनी पराभूत केले. त्या सामन्यात भारतीय कर्णधार प्रियम गर्गने 56, सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने 59 आणि ध्रुव जोरेलने 52 धावांची खेळी केली. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध जपानचा स्पर्धेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यामुळे दोन्ही संघांना सामना गुण देण्यात आले. या कारणास्तव ते गट-अ मध्ये दुसर्या स्थानावर आहे तर एक सामना जिंकल्यानंतर भारताने पहिले स्थान मिळवले आहे.