
IND vs ENG Test 2021: इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया आज, 2 जून रोजी रवाना होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ आणि इंग्लिश टीम 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमनेसामने येतील. यापूर्वी इंग्लिश संघाचा कर्णधार जो रूट म्हणाला की अॅशेसपूर्वी भारताचा मालिकेत 5-0 ने क्लीन स्वीप उत्तम तयारी असेल. 8 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅशेस मालिका रंगणार आहे. बुधवारपासून लॉर्ड्स येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत इंग्लंडचे नेतृत्व करणारा रूट म्हणाला, त्याचा देशात खेळल्या जाणाऱ्या सातही कसोटी सामने जिंकण्याचा निर्धार आहे. रूटने पहिल्या कसोटीपूर्वी ब्रिटिश माध्यमांना सांगितले की, “संपूर्ण उन्हाळ्यात ऑस्ट्रेलिया बद्दल सतत संभाषणे चालू राहतील.” (India Tour of England 2021: टीम इंडियामध्ये इंग्लंड विरोधात या 3 खेळाडूंना स्थान मिळणं कठीण, कदाचित बेंचवर बसून काढतील संपूर्ण दौरा)
“त्यापासून सुटका नाही. आम्ही बर्याच काळापासून म्हणतो आहे की आम्ही त्या मालिकेच्या दिशेने योजना आखत आहोत. एक इंग्लिश चाहता म्हणून, एक इंग्लिश खेळाडू म्हणून ही अशी एक महत्वपूर्ण मालिका आहे आणि ज्याचे वजन खूप जास्त आहे,” रूटने पुढे म्हटले. भारत विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. “तुम्ही संघाच्या तयारीविषयी बोलता - ऑस्ट्रेलियामध्ये जाण्यापूर्वी सात कसोटी सामने जिंकणे हा आत्मविश्वास वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. सध्या या दोन सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळणे ही या खेळाडूंसाठी उत्तम संधी आहे.” रूटने 2021 कॅलेंडरमध्ये 228, 186 आणि 218 धावा करत शानदार सुरुवात केली. मात्र इंग्लंड दौऱ्यावर इंग्लिश संघात कसोटी, वनडे आणि टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळण्यापूर्वी भारतीय संघ 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंड विरोधात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळणार आहे. कसोटी क्रिकेटचे वर्ल्ड कप म्हणून आयसीसीच्या या स्पर्धेकडे पहिले जात आहे आणि भारत-न्यूझीलंड संघ पहिल्या विजेतेपदासाठी सर्वपरीने प्रयत्नशील असतील. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून विराट कोहली व केन विल्यमसन यांनी आजवर एकही आयसीसीची ट्रॉफी उंचावलेली नाही आहे. विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघाने 2019 वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात प्रवेश केला होता पण यजमान इंग्लंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे स्वप्न भंगले.