IND vs ENG: विराट कोहलीला बाद केल्यानंतर व्यक्त करत असलेल्या आनंदाबद्दल जेम्स अँडरसनने केला खुलासा
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

जेम्स अँडरसनने (James Anderson) विराट कोहलीला (Virat Kohli) सात वेळा बाद केले आहे. हा एक-अंकी क्रमांक असला तरी खेळाच्या दोन दिग्गजांच्या लढाईत कोणाचे वर्चस्व आहे हे सिद्ध करते. जेम्स अँडरसन आणि विराट कोहली यांच्यातील बॅट-बॉलची लढाई खूप जुनी आहे. 2014 पासून सुरु झालेल्या या लढाईत कधी विराट वर्चस्व गाजवताना दिसला तर कधी अँडरसन. 2014 मध्ये अँडरसनविरुद्ध फ्लॉप शॉ नंतर 2018 मध्ये भारतीय (India) कर्णधाराने इंग्लंड (England) वेगवान गोलंदाजाला पूर्ण दौऱ्यात आपल्या विकेटसाठी त्रास दिला. मात्र, यंदा अँडरसनने कोहलीवर वर्चस्व गाजवत त्याला दोनदा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारा अँडरसन एक आहे. दरम्यान, कोहलीची विकेट घेतल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनचे कारण सांगताना अँडरसन म्हणाला की, विराटला त्याला आऊट करण्याचा काय अर्थ आहे हे त्याला दाखवायचे आहे. आणि आता ओव्हलमध्ये चौथ्या कसोटीत दोघांमधील हे द्वंद्व अधिक तीव्र होणार असल्याचं दिसत आहे. (IND vs ENG 3rd Test Day 1: जेम्स अँडरसनच्या जाळ्यात पुन्हा अडकले चेतेश्वर पुजारा, Virat Kohli; इंग्लिश गोलंदाजाची अनोख्या रेकॉर्ड-बुकमध्ये एंट्री)

'द टेलिग्राफ' साठी एका लेखात अँडरसन म्हणाला, “जेव्हा मी लीड्समध्ये पहिल्या डावात कोहलीला बाद केले तेव्हा खूप भावना होत्या. हे अगदी ट्रेंट ब्रिजसारखे होते. मला वाटते की त्याच्याकडे आणखी बरेच काही आहे कारण तो एक चांगला खेळाडू आहे आणि कर्णधार देखील आहे. जेव्हा त्याची टीम विकेट घेते तेव्हा त्याच्यासाठी त्याचा किती अर्थ होतो हे तुम्ही बघा, म्हणून त्याला आऊट करण्याचा आमच्यासाठी काय अर्थ होतो हे मी त्याला दाखवायचे होते. आमचे मुख्य ध्येय भागीदारीत गोलंदाजी करणे आहे आणि हेडिंग्लेने दुसऱ्या डावात एकत्र काम केल्याचे एक चांगले उदाहरण आहे. पहिले 12 चेंडू मी विराट कोहलीला टाकले, त्याने 10 खेळले नाही. जो रूट मला सांगत होता की त्याला खेळवण्याचा अधिक प्रयत्न करू.” हेडिंग्ले कसोटीत अँडरसनने फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर केएल राहुल, कोहली आणि चेतेश्वर पुजाराला बाद करून पहिल्या डावात फक्त सहा धावा दिल्या.

भारताने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. कोहलीने मालिकेतील पहिले अर्धशतक करत 55 धावा केल्या, पण वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनच्या पाच विकेट्सने इंग्लंडला विजय मिळवून दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.