IND vs ENG 4th Test 2021: हार्दिक पांड्याने हवेत उंच उडी मारत एकहाती पकडला जबरदस्त कॅच, व्हिडिओ पाहून करालं वाहवाह
हार्दिक पांड्या (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबादमधील (Ahmedabad) नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या कसोटी सामन्यासाठी कसून सराव करत आहे. याचाच एक नमुना पाहायला मिळाला जेव्हा भारतीय संघाचा (Indian Team) अष्टपैलू हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिक हा भारताच्या कसोटी संघाचा एक भाग आहे, परंतु जो रूटच्या इंग्लिश टीमविरुद्ध त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पांड्या कसोटी मालिका सुरू झाल्यापासून बेंचवर बसला आहे पण यामुळे अष्टपैलू खेळाडूला प्रशिक्षकांसह काही कठोर प्रशिक्षण सत्रात भाग घेण्यापासून रोखले नाही. हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक पोस्ट्स शेअर केल्या ज्यामध्ये तो फिल्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासोबत काम करताना दिसत होता. (IND vs ENG 4th Test: चौथ्या अहमदाबाद टेस्टपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज Jasprit Bumrah याची माघार, हे आहे कारण)

एका व्हिडिओंमध्ये पांड्या बाउंड्री लाईनवर जबरदस्त झेल घेतानाही दिसून आला. हार्दिकने सीमारेषापासून काही मीटर अंतरावर हवे उडी मारत एका हाताने चेंडू झेल पकडला. टीम इंडियाच्या एका चाहत्याने सोशल मीडिया ट्विटरवर हार्दिकच्या भन्नाट एकहाती कॅचचा व्हिडिओ शेअर केला जो जबरदस्त व्हायरल होत आहे. हार्दिकने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली होती. त्याने आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी केली नाही आणि तरीही खांद्याच्या दुखापतीतून सावरत तो गोलंदाजीत पुन्हा लय शोधण्याचे काम करीत आहे. तथापि, अष्टपैलू खेळाडू सध्या सुरू असलेल्या मालिकेत यजमान संघाला नेट्समध्ये गोलंदाजी करत आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्यास हार्दिक नियमितपणे गोलंदाजीला सुरुवात करेल का हे पाहणे शिल्लक आहे. मात्र, अहमदाबादमधील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असल्याने त्याचा समावेश होण्याची शक्यता कमीच आहे आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयी संयोजनासह अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 10 विकेटने धुव्वा उडवत 2-1 अशी मालिकेत आघाडी घेतली आणि यजमान संघाला आला आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सामन्यात विजय किंवा ड्रॉची गरज आहे.