IND vs ENG 3rd Test: जो रूट आणि रोहित शर्मा यांना WTC च्या ‘या’ यादीत अव्वल स्थान पटकावण्याची सुवर्ण संधी, विराट कोहलीचे हजारी पार करण्यावर लक्ष
जो रूट आणि रोहित शर्मा (Photo Credit: Facebook)

IND vs ENG 3rd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship) लढत अधिक रंजत बनली आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामन्यात दोन्ही संघाकडे यंदा जून महिन्यात आयोजित होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) प्रवेश मिळवण्यासाठी अखेरसी संधी असेल. या सामन्यातील पराभवाने संघाच्या आशा संपुष्टात येईल. चेन्नई येथील दुसऱ्या सामन्यात चॅम्पियनशिपमध्ये हजार धावांचा टप्पा पार करणारा टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पहिला भारतीय आणि आशियाई फलंदाज होता. यानंतर आता 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रूट (Joe Root) आणि भारतीय सलामी फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) या चॅम्पियनशिपच्या एलिट यंदाची अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. (Team India Pink-Ball Test: गुलाबी बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारा ‘हा’ आहे पहिला आणि सध्याचा एकमेव भारतीय फलंदाज, ईडनवर केली होती कमाल)

टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु झाल्यापासून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबूशेनने 13 सामन्यात 1675 धावा करत मानाचे स्थान मिळवले आहे. त्यानंतर, इंग्लिश कर्णधार रूट 18 सामन्यात 1589 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे, लाबूशेनला मागे टाकून पहिले स्थान मिळवण्यासाठी रूटला या सामन्यात 87 धावांची गरज आहे. शिवाय, रोहित शर्माने 890 आणि विराटने चॅम्पियनशिपमध्ये 850 धावा केल्या आहेत. अशास्थतीत, रोहित आणि विराटला हजारी धावसंख्या टप्पा गाठण्यासाठी अनुक्रमे 110 आणि 150 धावांची गरज आहे. दुसरीकडे, रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 4 शतके केली आहेत आणि या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे तर, ऑस्ट्रेलियन लाबूशेनने सर्वाधिक 5 वेळा शंभरी गाठली आहे. त्यामुळे रोहितला तिसऱ्या सामन्यात दोन्ही डावात शतक करून लाबूशेनला मागे टाकून अव्वल स्थान गाठू शकतो.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध मोटेरा स्टेडियमवरील तिसरा सामना गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळला जाणार आहे. सध्या दोन्ही संघातील मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे आणि तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यावर दोन्ही संघाचे लक्ष असेल. तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल होणे निश्चित आहे. जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार असून कुलदीप यादव व मोहम्मद सिराजला बेंचवर बसावे लागेल. शिवाय, इंग्लंड संघात देखील जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करतील.